शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

ंमनपाची बंद असलेली शाळा नं.३ पुन्हा सुरू होणार जे.पी.सी.बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट सुरू करणार शाळा

By admin | Published: March 23, 2017 5:19 PM

जळगाव-समाजातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्ज्याचे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण प्राप्त व्हावे तसेच कुणीही दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहु नये या उद्देशाने जळगाव पिपल्स बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टतर्फे शहरातील मनपाची सेंट्रल स्कूल नंबर ३ ही बंद असलेली शाळा येत्या १५ जून पासून जळगाव पब्लिक स्कूल म्हणून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव-समाजातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्ज्याचे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण प्राप्त व्हावे तसेच कुणीही दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहु नये या उद्देशाने जळगाव पिपल्स बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टतर्फे शहरातील मनपाची सेंट्रल स्कूल नंबर ३ ही बंद असलेली शाळा येत्या १५ जून पासून जळगाव पब्लिक स्कूल म्हणून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जळगाव पिपल्स बॅँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, उमविचे माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील, डॉ. प्रकाश कोठारी, डॉ. देविदास सरोदे, चंदन अत्तरदे आदी उपस्थित होते. समाजातील आर्थिक दुर्र्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत व चांगल्या दर्ज्याचे शिक्षण मिळावे हा उद्देश ही शाळा सुरू करण्याचा असल्याची माहिती प्रकाश चौबे यांनी दिली.

प्रवेशाला सुरुवात
१५ जून पासून शाळेत नर्सरी, ज्युनियर केजी, सिनीयर केजी व पहिली अशा चार वर्गांना सुरू केली जाणार असून, शाळेच्या प्रवेशांना सुरुवात झाली आहे. या शाळेत सीबीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांंच्या विकासासाठी सुसज्ज ग्रंथालय, ई क्लासरूम आदी सुविधा या शाळेत पुरविल्या जाणार आहेत. शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य गणवेश, बुट्स, स्कूल बॅग, व‘ा व पुस्तके शाळेतर्फे विनामूल्य देण्यात येणार आहे. शाळेत विद्यार्थी संख्या मर्यादित राहणार असल्याने पालकांनी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.