शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या सहायक पद भरतीत गोलमाल वशिलेबाजीचा गंध : व्यवस्थापन मंडळाच्या नियमांना तिलांजली

By admin | Updated: May 5, 2014 20:56 IST

(वृत्त मालिका)

(वृत्त मालिका)
सतीश डोंगरे, नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात गैरव्यवहाराचे एकापाठोपाठ एक प्रकार समोर येत असतानाच, परीक्षा विभागाच्या सहायक पद भरतीत गोलमाल झाल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या नियमांना तिलांजली देत करारावरील १७ कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी तत्त्वावर घेण्याचा घाट घातला जात असून, या प्रकरणाला वशिलेबाजीचा गंध येत आहे.
२००८-०९ मध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सहायक म्हणून करार तत्त्वावर १७ कर्मचार्‍यांना घेण्यात आले होते. यावेळी व्यवस्थापन मंडळाच्या नियमानुसार या कर्मचार्‍यांकडून रीतसर हमीपत्र लिहून घेण्यात आले असून, हमीपत्रानुसार दर सहा महिन्याने पुनर्करार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार तीन वर्षांनंतर सेवेतून कमी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र विद्यापीठाने सर्व नियम धाब्यावर बसवून या कर्मचार्‍यांना आतापर्यंत सेवेत कायम ठेवले आहे. वास्तविक या सर्व कर्मचार्‍यांचा २०१२ मध्येच सेवेचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु तरीदेखील विद्यापीठाने सर्व कर्मचार्‍यांचा सहा महिन्यांचा करार वाढवून देत व्यवस्थापन मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
विशेष म्हणजे, आता विद्यापीठ या सर्व १७ कर्मचार्‍यांना कुठलीही जाहिरात न देता कायमस्वरूपी करणार असल्याने या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अर्थकारणाची देवाण-घेवाण झाली असल्याची चर्चा आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासनाचा अध्यादेश जारी करण्यात आला असून, यामध्ये सर्व १७ कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी तत्त्वावर विद्यापीठात रुजू करण्याचे नमूद केले आहे; तर उर्वरित सहायकांची ३३ पदे भरताना मागासवर्गीयांकरिता शासनाने विहित केलेल्या आरक्षण धोरणाप्रमाणेच पदे भरावीत, असे अध्यादेशात नमूद केले आहे. गेल्या वीस वर्षांपासून विद्यापीठात कनिष्ठ सहायक पदावर काम करणार्‍या ३३ कर्मचार्‍यांबाबत विद्यापीठाकडून असा दुजाभाव केला जात असल्याने यामागे नेमके गौडबंगाल आहे तरी काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या १७ कर्मचार्‍यांमधील बहुतेक कर्मचारी हे विद्यापीठातील बड्या अधिकार्‍यांचे नातेवाइक असल्यानेच हा सर्व घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे. त्याकरिता २६ मार्च २०१४ मध्ये झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत या सर्व कर्मचार्‍यांच्या मुदतवाढीचा प्रस्तावदेखील मांडण्यात आला असून, त्यावर कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांची स्वाक्षरी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उर्वरित ३३ कनिष्ठ सहायकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वीस वर्षांपासून सेवेत असलेल्यांना डावलून १७ कर्मचार्‍यांनाच सहायक म्हणून कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे कारण तरी काय, असा सवाल उपस्थित केला आहे.
-------
इन्फो
परीक्षेचे कारण
परीक्षा विभागात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे परीक्षाविषयक कामे करण्यासाठी सहायकांची आवश्यकता आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मे मध्ये होणार असल्याने सहायकांच्या सेवा न घेतल्यास परीक्षाविषयक कामे करण्यास अडचणी येऊ शकतात. विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या व त्यानुसार वाढलेली परीक्षार्थींची संख्या यामुळेच सहायकांना सहा महिन्यांसाठी करारावर नेमणूक देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचा निर्वाळा विद्यापीठाने दिला आहे. मात्र २०१३ मध्येच सेवेचा कालावधी (तीन वर्षे) पूर्ण झालेला असताना, करारात मुदतवाढ देण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.