शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

टेकफेस्टमध्ये अनुभवता येणार उत्कंठतावर्धक क्षण

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

टेकफेस्टमध्ये अनुभवता येणार उत्कंठतावर्धक क्षण

टेकफेस्टमध्ये अनुभवता येणार उत्कंठतावर्धक क्षण
मुंबई :
आयआयटी मुंबईचा तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित टेकफेस्ट २ ते ४ जानेवारीदरम्यान आयआयटी कॅम्पसमध्ये पार पडणार आहे. टेकफेस्टच्या टेक्नोहोलीक्स या सत्रात तंत्रप्रेमींना जागतिक पातळीवरील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घातलेल्या लक्षवेधक कार्यक्रमांचे उत्कंठतावर्धक क्षण अनुभवता येणार आहेत.
आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन आदी असंख्य देशातील तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील मान्यवर तज्ज्ञ, संशोधकही यामध्ये सहभागी असतील. तीन दिवस चालणार्‍या या टेकफेस्टमध्ये तंत्रज्ञान व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यासह रोबो, सुपर कारचे प्रदर्शन आणि विविध विषयांवर संवाद करणार्‍या रोबोचे अनोखे प्रयोग टेकफेस्टचे आकर्षण ठरणार आहे.
टेक्नोहोलीक्स या सत्रातील इन्नर पीस या शोमध्ये ऑस्ट्रियातील जगप्रसिद्ध कलावंत थ्री डी माप्पिंग शो करणार असून तो सर्व रसिकांसाठी दुर्मिळ अनुभव असणार आहे. तसेच अडेलेडा या शो मध्ये पाय्रोटेकनिक्स आणि डान्स दोन्ही असणार आहे. यामध्ये युक्रेनचे कलावंत भाग घेणार आहेत. तर खावोटर अल्दालाम या कार्यक्रमात वेगवेगळ्या रंगांच्या एलईडी लाइट्सचा वापर कल्पकतेने केला जाणार आहे. तसेच ते नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणाचा संदेश या कार्यक्रमातून देणार आहेत.
फर्स्ट प्रोजेक्ट हा शो टेकफेस्ट २०१५ ची ओळख ठरणार आहे. ‘ामध्ये फक्त ड्रमचा वापर केला जाणार आहे. तसेच ओझोन या इव्हेंटमध्ये विज्ञान आवडणार्‍या आणि न आवडणार्‍या सर्वांचे मनोरंजन होणार आहे. हा इव्हेंट विनामूल्य असून यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा, वर्कशॉप, सेटअप्स आणि लक्षात राहण्यासारखे स्ट्रीट इव्हेंट्सचा समावेश असणार आहे.
ओझोन इव्हेंटमधील फ्लाइंग स्टीम्यूलेटर या प्रकारात जमिनीवर राहून आकाशात उडल्याचा अनुभव घेता येईल. त्याचप्रमाणे पेंटबॉल, लेझर टॉग, बंगी रन, अचेर्री तंत्रप्रेमींना वेगळाच अनुभव देतील. तसेच आंतरराष्ट्रीय कलावंतही यामध्ये जादूचे प्रयोग सादर करणार आहेत.