शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक

By admin | Updated: May 15, 2014 23:21 IST

मुंब्रा येथील सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता नसतानाही महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्याचे समोर आले आहे.

सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूकमान्यता नसताना विद्यार्थ्यांना दिले प्रवेश : विद्यार्थ्यांचे वर्ष वायामुंबई :मुंब्रा येथील सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता नसतानाही महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी घेतलेली कागदपत्रे आणि पैसेही परत देण्यास नकार दिल्याने पालक हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी पालक पोलिस ठाण्यात धाव घेणार आहेत.सेंट मेरी डिग्री महाविद्यालय गेल्या शैक्षणिक वर्षापासून खौसा मुंब्रा येथे सुरु करण्यात आले. परंतू महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रशासनाने विद्यापीठाकडून मान्यताच घेतली नाही. असे असतानाही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेशही दिले. येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखा सुरु करण्यात आल्या. कला आणि वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांकडून खूपच कमी प्रतिसाद मिळाल्याने महाविद्यालयाने या शाखा सुरु केल्या नाहीत. मात्र, एफ.वाय.बी.कॉमसाठी सुमारे २५ विद्यार्थी आल्याने महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मात्र, विद्यापीठाकडून या अभ्यासक्र्रमाला मान्यताच नसल्याने महाविद्यालयाने पहिल्या सत्राची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत नसल्याने पालकांनी महाविद्यालयाकडे विचारणा केली. तेव्हा महाविद्यालयाने प्रवेशासाठी दिलेली कागदपत्रे परत घेऊन जाण्यास सांगितले.याबाबत पालकांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. मात्र, विद्यापीठाने या महाविद्यालयाला मान्यताच दिली नसल्याने महाविद्यालयावर कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी पालकांना कोणतीही याबाबतची कोणतीही सुचना दिली नव्हती. यामुळे पालकांनीही महाविद्यालयावर विश्वास ठेवत विद्यार्थ्यांचे प्रवेश निि›त केले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरल्यानंतर दिलेल्या पावतीमध्ये महाविद्यालयाला विद्यापीठाची मान्यता असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आम्ही या महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, आता महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा घेण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. महाविद्यालयाकडून आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर पालक पोलिसांकडे लवकरच दाद मागणार आहेत.महाविद्यालाने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून साडे चार हजार रुपये शुल्क घेतले होते. मात्र, हे शुल्कही परत देण्यास महाविद्यालयाने नकार दिला असल्याचे, एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.महाविद्यालयाला विद्यापीठाकडून मंजूरी घेण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने महाविद्यालयाला मंजूरी दिलेली नाही. यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. यासाठी विद्यार्थ्यांची घेतलेली कागदपत्रे आणि शुल्क परत देण्यात आले असून आता कोणतीही समस्या नसल्याचे, महाविद्यालयाच्या प्राचार्या तेलिलका यांनी सांगितले.