दि प्रेडिक्शन संस्थेतर्फे रविवारी ज्योतिषविषयक व्याख्यान

By Admin | Updated: April 15, 2016 00:45 IST2016-04-15T00:42:51+5:302016-04-15T00:45:27+5:30

नाशिक - दि प्रेडिक्श्न स्कूल ऑफ वेदिक ॲस्ट्रोलॉजी या संस्थेच्या वतीने ज्योतिष सायनाचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवार, दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शंकराचार्य संकुल येथे इस्त्रोचे माजी संचालक नितीन घाटपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत किरण देशपांडे यांनी दिली. यावेळी दाते पंचांगचे मोहन दातेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. यावेळी पंचांग म्हणजे काय? ते कसे पहावे, ते सर्वत्र सारखे कसे आणता येईल याविषयी माहिती देण्यात येणार आहे. नितीन घाटपांडे हे दृकश्राव्य माध्यमातून स्लाइड शोद्वारे ज्योतिषविषयक संकल्पनांची सोप्या पद्धतीने माहिती देणार आहे. या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Astrological lectures on Sunday by The Prediction Institute | दि प्रेडिक्शन संस्थेतर्फे रविवारी ज्योतिषविषयक व्याख्यान

दि प्रेडिक्शन संस्थेतर्फे रविवारी ज्योतिषविषयक व्याख्यान

नाशिक - दि प्रेडिक्श्न स्कूल ऑफ वेदिक ॲस्ट्रोलॉजी या संस्थेच्या वतीने ज्योतिष सायनाचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवार, दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शंकराचार्य संकुल येथे इस्त्रोचे माजी संचालक नितीन घाटपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत किरण देशपांडे यांनी दिली. यावेळी दाते पंचांगचे मोहन दातेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. यावेळी पंचांग म्हणजे काय? ते कसे पहावे, ते सर्वत्र सारखे कसे आणता येईल याविषयी माहिती देण्यात येणार आहे. नितीन घाटपांडे हे दृकश्राव्य माध्यमातून स्लाइड शोद्वारे ज्योतिषविषयक संकल्पनांची सोप्या पद्धतीने माहिती देणार आहे. या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Astrological lectures on Sunday by The Prediction Institute