शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूबाबत जि.प. आरोग्य विभाग खडबडून जागा

By admin | Updated: November 6, 2014 01:34 IST

रवी गात ,अंबड जिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूरोगाच्या साथीबद्दल ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती समोर आणल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

रवी गात ,अंबडजिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूरोगाच्या साथीबद्दल ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती समोर आणल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. बुधवारी या विभागाच्या वतीने अंबड येथे आढावा बैठक घेण्यात आली.संपुर्ण तालुक्यात एकाच वेळी ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार आहे. या दिवशी तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्याचे आदेश बुधवारी दिले. अंबड पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत बुधवारी अंबड पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही.एस.भटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत संपूर्ण तालुक्यात १० नोव्हेबंर रोजी एकाच दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे ठरले. कोरडा दिवस व डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांविषयी सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ५० हजार पत्रके छापण्याचेही यावेळी ठरले. प्रतिबंधक उपायांची माहिती जनसामान्यांना होण्यासाठी दिनांक ७ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टीनंतर सुरु होणाऱ्या तालुक्यातील सर्व शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता व डेंग्यू प्रतिबंधक उपायांविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात येतील. तसेच १० नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी जनजागृतीपर प्रभातफेरी काढुन कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करणार आहेत. बैठकीनंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी सांगितले की, डेंग्यू विरोधात उघडण्यात आलेल्या मोहिमेत पंचायत समितीचे बहुतांश विभाग सहभागी होणार आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी पाळण्यात येणाऱ्या ‘ड्राय डे’ वर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक म्हणून दोन विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या ड्राय डे विषयी जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणार आहे.