शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बदल्यांसाठी दबावनीती ‘फेल’

By admin | Updated: June 9, 2016 23:53 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कधी बिंदू नामावली अद्ययावत नसल्यामुळे, तर आता सहशिक्षकांच्या जागाच रिक्त नसल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याची शक्यता मावळली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कधी बिंदू नामावली अद्ययावत नसल्यामुळे, तर आता सहशिक्षकांच्या जागाच रिक्त नसल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याची शक्यता मावळली आहे. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी अनेकदा निवेदने देऊन, उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी नवीन संघटनाही स्थापन केली. त्या माध्यमातून दबावाचे राजकारण केले; पण ते सारे व्यर्थ गेल्याची भावना आता शिक्षकांची झाली आहे. ३० मे ते ७ जूनदरम्यान जिल्हा परिषद मुख्यालयासमोर आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी उपोषण केले. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना द्या, या एकाच मागणीसाठी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी उपोषणाला गर्दी केली. तेव्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये सहशिक्षकांची पदे रिक्त नसल्यामुळे सद्य:स्थितीत तरी आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना देणे शक्य नाही, असे कळविले. तरीदेखील शिक्षकांनी उपोषण सुरूच ठेवले. अखेर ६ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी उपोषणार्थी शिक्षकांना एका पत्राद्वारे कळविले की, जून महिन्यात पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जाईल. त्यानुसार काही पदे रिक्त झालीच तर त्यावर किंवा बिंदू नामावलीनुसार रिक्त बिंदूचा ताळमेळ घालून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना पदस्थापना दिल्या जातील. येथून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारे जवळपास ५०० ते ७०० शिक्षक आहेत. त्यांना शिक्षणाधिकारी कार्यालयाने नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा दिलेले आहे; पण राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने जाणारे शिक्षक येथेच कार्यरत राहिले. दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांतून औरंगाबाद जिल्हा परिषद शाळांमध्ये येणाऱ्या शिक्षकांची संख्या जवळपास ५०० आहे. जिल्ह्यात सहशिक्षकांची ६ हजार ८९७ एवढी पदे मंजूर असून, सध्या ६ हजार ७३१ सहशिक्षक कार्यरत आहेत. मंजूर पदांच्या प्रमाणात रिक्त पदे शिल्लक नाहीत. अलीकडेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली. आता १५ जूनपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया प्रस्तावित आहे. पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या पदांचा बिंदू नामावलीनुसार ताळमेळ घालून रिक्त होणाऱ्या बिंदूवर नियमानुसार आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना सामावून घेण्याची कार्यवाही करण्यास शिक्षण विभागाने अनुकूलता दर्शवली आहे.एकीकडे जिल्ह्यात शिक्षकांच्या जागाच रिक्त नाहीत. पदोन्नतीमुळे काही जागा रिक्त होतील, पण रिक्त होणाऱ्या जागांवर बिंदू नामावलीनुसार शिक्षकांना सामावून घेतल्यास बोटावर मोजण्याएवढ्याच शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी मिळू शकेल.