शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गौरी पुजनाऐेवजी सावित्रीचे पूजन

By admin | Updated: September 5, 2014 00:13 IST

शेख मोया, वस्सा वस्सा येथे गौरी पूजनाचा सण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

शेख मोया, वस्साजिंतूर तालुक्यातील वस्सा येथे गौरी पूजनाचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत होता. परंतु राऊत कुटुंबियाने पारंपरिक गौरी पूजनाऐवजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गेल्या वीस वर्षापासून निर्विघ्नपणे हा अभिनव पुरोगामी सण रामभाऊ राऊत हे साजरा करीत आहेत. कधी सूतक, इरळी किंवा अन्य कारणामुळे सावित्री पूजनाचा सणात खंड पडला नाही हे विशेष. आकर्षक आरस व सजावटीसह भक्तीभावाने राऊत कुटुंबिय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची व महात्मा फुले संमग्र वाङमयाचे वाचन करून पूजा करतात. रामभाऊ राऊत हे वस्सा परिसरात महात्मा फुले यांचे कट्टर अनुयायी म्हणून परिचित आहेत. पारंपरिक प्रथेला छेद देत त्यांनी आपल्या मुलाचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. ते स्वखर्चाने महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रचार करतात. रामभाऊ राऊत, पत्नी काशिबाई यांच्यासह २० वर्षापासून गौरी पूजना ऐवजी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेची पूजा करतात. तसेच त्यांची मुले व सूनाही या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेत आहेत. अल्पशिक्षित असलेल्या राऊत दांपत्याने आपल्या कृतीतून दाखविलेले पुरोगामी धाडस सुधारकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे, एवढे मात्र खरे.फुले दांपत्याविषयी कृतज्ञताबहुजन समाजाची अस्मिता जागृत करणाऱ्या फुले दांपत्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा पुरोगामी सण साजरा करतो, असे रामभाऊ राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. काशिबाई राऊत म्हणाल्या, महिलांना शिक्षण देऊन सामाजिक बंधनातून मुक्त करणाऱ्या व महिलांचा स्वाभिमान जागृत करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूूजन करताना आनंद होतो.