श्रावण सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: August 31, 2015 13:46 IST2015-08-31T13:35:54+5:302015-08-31T13:46:40+5:30

हिंदूसंस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी आयोजित श्रावण सोहळ्यात विविध स्पर्धांमधून सदस्यांनी एक वेगळीच चुणूक दाखवली.

Women's spontaneous response to the Shravan festival | श्रावण सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रावण सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 जालना : हिंदूसंस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी आयोजित श्रावण सोहळ्यात विविध स्पर्धांमधून सदस्यांनी एक वेगळीच चुणूक दाखवून आपले कलागुण सादर करत सर्वांचेच लक्ष वेधले. 
श्रावण साज फॅशन शो व एकापेक्षा एक अशा मजेदार उखाण्यांनी सभागृहात चांगलेच हस्याचे फवारे उडविले. ३0 ऑगस्ट रोजी खेरूडकर मंगल कार्यालयात सायंकाळी झालेल्या उत्साही सोहळ्यात सखीमंच सदस्यांनी एकच धूम केली. या सोहळ्यात सदस्यांसाठी श्रावण साज (फॅशन शो), उखाणे स्पर्धा, मेहंदी, थाळी सजावट स्पर्धा, फॅशन शोमध्ये स्पर्धकांनी पाना फुलापासून बनविलेले दागिने परिधान करणे आदी स्पर्धा पार पडल्या. सर्वच कार्यक्रमांना सखीमंच सदस्यांनी उत्स्फूर्त दाद देऊन आपल्यात असलेल्या कलागुणांचे उत्तम सादरीकरण केले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार, एम.एस.जैन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा श्रीपत, डॉ. हर्षदा बागल यांनी काम पाहिले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही सखीमंच सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रवींद्र देशपांडे यांनी खेरूडकर मंगल कार्यालय कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले.
सुभाषचंद गुलाबचंद घोडेगाववाला यांनी भाग्यवंत १५ विजेत्यांसाठी साड्यांचे प्रायोजकत्त्व स्वीकारले. यावेळी त्यांच्या हस्ते लकीड्रॉ काढण्यात येऊन विजेत्या सदस्यांना या साड्यांचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी) प्रथम- अनिता पाठे
द्वितीय- अश्‍विनी भोईटे
तृतीय- सीमा पवार उखाणे स्पर्धा प्रथम- सपना दायमा
द्वितीय- मृणाली रोजेकर
तृतीय- अर्चना वायकोस मेहंदी स्पर्धा प्रथम- अनुराधा आमटे
द्वितीय- अर्पणा ओवलकर
तृतीय- सोनाली लांडगे श्रावण साज प्रथम- रंजना लोखंडे
द्वितीय- चैताली वानखेडे
तृतीय- कल्पना मिठे पूजा थाळी सजावट स्पर्धा

Web Title: Women's spontaneous response to the Shravan festival