शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी जाणून घेतल्या ‘ब्युटी टिप्स’

By admin | Updated: June 20, 2016 00:53 IST

औरंगाबाद : प्रसाधनांचा वापर करण्यापूर्वी मात्र प्रत्येक महिलेने त्यात वापरलेल्या रासायनिक पदार्थांबद्दल जाणून घ्यायला हवे, अशी खबरदारी घेण्याचा उपदेश सौंदर्यतज्ज्ञ सुप्रिया सुराणा यांनी केला.

औरंगाबाद : प्रसाधनांचा वापर करण्यापूर्वी मात्र प्रत्येक महिलेने त्यात वापरलेल्या रासायनिक पदार्थांबद्दल जाणून घ्यायला हवे, अशी खबरदारी घेण्याचा उपदेश सौंदर्यतज्ज्ञ सुप्रिया सुराणा यांनी जेएसजी संगिनी महिला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केला. मेटालिक फेशिअल करण्याचे टाळावे, तसेच केस रंगवायचेच असतील तर सगळ्यात आधी ‘पॅच टेस्ट’ करावी, असे त्या म्हणाल्या. केसांसाठी मेंदीचा वापर करणे उत्तम असून, के सांना अधिक चांगला रंग येण्यासाठी मेंदी भिजवताना त्यात चहा किंवा कॉफीचे उकळलेले पाणी टाकावे, असे त्यांनी सुचविले. कार्यक्रमाची सुरुवात रीना मुनोत, विद्या कटके, रुपाली भंडारी, साधना शहा, स्वाती मल्हारा, नीलम बोरा यांनी म्हटलेल्या णमोकार मंत्राने झाली. साधना शहा, सुवर्णा शिसोदिया, सुदर्शना रुणवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीता ओसवाल यांनी स्वागत केले. मंडळाच्या अध्यक्षा जयश्री गुजराणी यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगविषयी मार्गदर्शन केले. श्रद्धा मुथा यांनी संचालन केले. यशस्वीतेसाठी शीतल पगारिया, लता मंडलेचा, संगीता रुणवाल आदींनी सहकार्य केले. केसांच्या योग्य वाढीसाठी रोज चार कढीपत्त्याची पाने, १ चमचा काळे किंवा पांढरे तीळ आणि चारोळीचे चार दाणे खावेत, असे सुराणा यांनी सुचविले. क्राफ्ट पेपरपासून दागिने बनविण्याच्या स्पर्धेत प्रतिभा दगडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिलांसाठी नृत्य शिबीर औरंगाबाद : आपली पारंपरिक लोककला व राजस्थानच्या संस्कृतीची ओळख नवीन पिढीला व्हावी, यासाठी अग्रवाल महिला समितीच्या वतीने दहा दिवसीय राजस्थानी नृत्यकला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य शिरोमणी शकुंतला पवार यांच्याकडून नृत्य शिकण्याची संधी शिबिरार्थींना मिळणार आहे. नृत्याची आवड असणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हे शिबीर एक पर्वणीच ठरणार आहे. दि. २१ ते ३० जून या काळात अग्रसेन भवन सिडको येथे स. १० ते सायं. ७ पर्यंत हे शिबीर चालणार आहे. यामध्ये वय वर्षे ७ ते ६० या वयोगटातील महिला सहभाग नोंदवू शकतात. तसेच सर्व समाजाच्या महिलाही या शिबिरात भाग घेऊ शकतात. हळदी, मेंदी, बन्नाबन्नी यासारख्या खास लग्नाच्या प्रसंगाचे नृत्यही येथे शिकविण्यात येईल. दि.२३ पासून घुमर नृत्याची आवड असणाऱ्या महिलांसाठी खास सातदिवसीय नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरार्र्थींना धाडस यावे, यासाठी ३० जून रोजी तापडिया नाट्यमंदिर येथे एक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. पत्रकार परिषदेत निर्मला अग्रवाल, सुनीता अग्रवाल, जयश्री अग्रवाल, गंगा अग्रवाल, रेखा भारुका, मालती गुप्ता, मीना गुप्ता, प्रीती पित्ती, कविता बन्सल, गीता अग्रवाल, अरुणा बजाज, किरण अग्रवाल, रजनी बगाडिया, वंदना बगाडिया आदींची उपस्थिती होती.