शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून महिलेचा गळा चिरला

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत एका तरुणाने घरात घुसून महिलेचा चाकूने गळा चिरला.

औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत एका तरुणाने घरात घुसून महिलेचा चाकूने गळा चिरला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी घडली. स्वाती राजू नवपुते (२५, रा. चौधरी कॉलनी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ती खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी स्वाती नवपुते या घराच्या छतावर धुणे धूत होत्या. घरची मंडळी खाली बसलेली होती. सात वाजेच्या सुमारास बाजूच्या छतावरून एक तरुण नवपुते यांच्या छतावर उडी मारून पोहोचला. अचानक समोर आलेल्या या तरुणाला पाहून नवपुते घाबरल्या. लगेच त्याने हाताने त्यांचे तोंड दाबले आणि खिशातून चाकू काढून तुला आणि तुझ्या नवऱ्याला दोघांनाही संपवून टाकतो, असे म्हणत त्याने चाकूने नवपुते यांच्या गळ्यावर वार केला. लगेच पुन्हा तो छतावरून उडी मारून पसारही झाला. जखमी झालेल्या नवपुते यांनी आरडाओरड केल्यानंतर खाली घरात बसलेली मंडळी धावत छतावर आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्वाती नवपुते यांना तातडीने रुग्णालयात हालविण्यात आले.