कंटेनरच्या चाकाखाली आल्याने महिला गतप्राण
By Admin | Updated: September 5, 2014 00:51 IST2014-09-05T00:48:25+5:302014-09-05T00:51:16+5:30
हतनूर : स्पीड ब्रेकर स्ट्रीपवर दुचाकीवरून पडल्याने मागून येणाऱ्या कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन पंचशीलाबाई राजू शिरसाठ (रा. गल्लेबोरगाव) ही महिला गतप्राण झाली.

कंटेनरच्या चाकाखाली आल्याने महिला गतप्राण
हतनूर : औरंगाबाद-धुळे महामार्गावर टापरगावनजीक झालेल्या अपघातात स्पीड ब्रेकर स्ट्रीपवर दुचाकीवरून पडल्याने मागून येणाऱ्या कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन पंचशीलाबाई राजू शिरसाठ (रा. गल्लेबोरगाव) ही महिला गतप्राण झाली. सदर घटना सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली.
राजू शिरसाठ दुचाकीवरून (क्र. एमएच २०- ए. झेड. ४६४४) पत्नीसह गल्लेबोरगाव येथून कन्नडकडे जात असताना टापरगावनजीक स्पीड ब्रेकर स्ट्रीपवर दुचाकीवरून पडल्याने मागाहून येणाऱ्या कंटेनरच्या (क्र. एचआर ५५- पी ६९९२) मागील चाकाखाली येऊन महिला गतप्राण झाली. या अपघातात पती राजू शिरसाठ जखमी झाले.
यावेळी टापरगावचे पोलीस पाटील बाबुराव मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृत महिलेस व जखमी पतीस औरंगाबादला हलविले. सदर कंटेनर घटनास्थळी न थांबल्याने पाच कि.मी. पुढे हतनूर शिवारात पो.पा. प्रकाश पवार, संतोष ढोले यांनी कंटेनरचा पाठलाग करून पकडले. या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पुढील तपास कन्नड पोलीस ठाण्याचे पो.नि. सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौजदार मनोज घोडके, पोकॉ. रामेश्वर जाधव हे करीत आहेत. (वार्ताहर)