वाळूज महानगर: बजाजनगर परिसरातील साई श्रद्धा पार्क (वडगाव कोल्हाटी) येथे बुधवारी एका ४० वर्षीय महिलेची तिच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. साधना महेंद्र सोनपेटकर (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या शैला सोनार (४५) नावाच्या एका महिलेने केली असून, पोलिसांनी तिला रंगेहात ताब्यात घेतले आहे. या घटनेने वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हल्ल्यात चाकू आणि पिस्तूलचा वापरमिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैला सोनार ही साधना यांच्या घरात थेट शिरली आणि काही कळण्यापूर्वीच तिने साधना यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, साधना यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झडती दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक एयरगन आढळून आले आहे, ज्यावरून ही हत्या पूर्ण नियोजित असल्याचे दिसून येत आहे.
आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यातपोलिसांनी आरोपी शैला सोनारला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. अटकेच्या वेळी झालेल्या झटापटीत आरोपी महिला किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र हत्येचे अधिकृत कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
Web Summary : In Bajaj Nagar, a 40-year-old woman, Sadhana Sonpetkar, was murdered in her home. Police arrested Shaila Sonar, 45, at the scene. The attack involved a knife. Personal dispute suspected; investigation ongoing.
Web Summary : बजाज नगर में 40 वर्षीय साधना सोनपेटकर की घर में घुसकर हत्या कर दी गई। पुलिस ने 45 वर्षीय शैला सोनार को मौके से गिरफ्तार किया। हमले में चाकू का इस्तेमाल किया गया। निजी विवाद का संदेह; जांच जारी है।