महिला उतरल्या रस्त्यावर

By Admin | Updated: June 19, 2014 00:18 IST2014-06-19T00:02:01+5:302014-06-19T00:18:58+5:30

नांदेड: शहर व जिल्ह्यात सध्या अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन असलेला मटका खुलेआम सुरु आहे़ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर मटका बुकींनी आपली कार्यालये थाटली आहेत़

The woman came down the street | महिला उतरल्या रस्त्यावर

महिला उतरल्या रस्त्यावर

नांदेड: शहर व जिल्ह्यात सध्या अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन असलेला मटका खुलेआम सुरु आहे़ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर मटका बुकींनी आपली कार्यालये थाटली आहेत़ विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलिस ठाण्याच्या समोरच पहावयास मिळाला़ त्या विरोधात आता या भागातील महिलांनी पुढाकार घेतला असून पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे़
जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मटका खेळला जात आहे़ पोलिसांकडून त्यांच्यावर होणारी कारवाईही अनेकवेळा संशयाच्या भोवऱ्यात सापडते़ त्यामुळे शहरातील मटका बुकींना जोर आला आहे़ शिवाजीनगर, इतवारा, नांदेड ग्रामीण, विमानतळ व भाग्यनगर या पाचही पोलिस ठाण्याच्या हद्दीत पानटपरीपासून ते चहा कँटिन, हॉटेल, केशकर्तनालय आदी ठिकाणी मटक्याच्या चिठ्ठ्या फाडण्यात येत आहेत़ तर काहींनी तंत्रज्ञानाचा उपयोग करीत मोबाईलवर एसएमएसद्वारे मटका घेण्याचा फंडा सुरु केला आहे़
शिवाजीनगर हद्दीतील नवी आबादी, आंबेडकरनगर, जयभीमनगर, गोकुळनगर, विष्णूनगर, नवीन मोंढा या भागात तर मटका बुकींनी आपली कार्यालये थाटली आहेत़ या ठिकाणी खुलेआमपणे भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत मटका खेळला जातो़ मागील वर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात मटका खेळण्याच्या कारणावरुन दोन समाजात तेढ निर्माण झाला होता़ या पार्श्वभूमीवर मटका बुकींवर व खेळणाऱ्यांवर आळा घालण्याची मागणी होत आहे़
विशेष म्हणजे, शिवाजीनगर हद्दीत तर पोलिस ठाण्याच्या समोरच हा प्रकार खुलेआम सुरु आहे़
मात्र याबाबत बहुधा वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नसावी़ त्यात आता मटका बंद होण्याच्या मागणीसाठी या भागातील महिलांनी पुढाकार घेतला आहे़ त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी केली आहे़ तसेच मटका बुकी आणि शिवाजीनगर पोलिसांचे हितसंबंध असल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The woman came down the street