शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम उपविभाग अधिकाऱ्यांविना

By admin | Updated: September 5, 2014 00:13 IST

विठ्ठल भिस, पाथरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या विभागांतर्गत सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.

विठ्ठल भिस, पाथरीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाथरी येथील उपविभागीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या विभागांतर्गत सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे या उपविभागात दोन तालुके असतानाही उपअभियंता हे पद गेल्या तीन वर्षापासून रिक्त असतानाही याकडे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनाही लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. ग्रामीण रस्त्याचा कणा समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागावर रस्ते विकास अवलंबून असतो. पाथरी येथे पाथरी व मानवत या दोन तालुक्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयात मागील तीन वर्षापासून सर्वच कारभार रामभरोसे सुरू आहे. उपविभागीय कार्यालय केवळ नावापुरते आहे की, काय? असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी परिस्थिती या कार्यालयाची झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत विकासाची कामे याच उपविभागामार्फत केली जातात. कामाचे मार्कआऊट देण्यापासून कामाचे अंतिमिकरणापर्यंत शाखा अभियंत्यांनी कामावर लक्ष देणे आवश्यक असते. परंतु, सेवकही नाही, रोड कारकूनही नाही, शाखा अभियंता नाही आणि उपअभियंतेही नाहीत, अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यास एकही कर्मचारी नसल्याने गुत्तेदार आपल्या सोयीप्रमाणे कामे करतात, बिल रेकॉर्ड करतात आणि काम पूर्ण होते, अशीच काही अवस्था झाली आहे.