शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
2
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
3
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
4
विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
7
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
10
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
11
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
12
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
13
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
14
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
15
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
16
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
17
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
18
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
19
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
20
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचे जंगी स्वागत

By admin | Updated: October 5, 2014 00:03 IST

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा शनिवारी आझाद चौक, रहेमानिया कॉलनी, किराडपुरा, शरीफ कॉलनी भागात पोहोचली. शेकडो कार्यकर्त्यांनी पदयात्रेचे जंगी स्वागत केले.

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा शनिवारी आझाद चौक, रहेमानिया कॉलनी, किराडपुरा, शरीफ कॉलनी भागात पोहोचली. शेकडो कार्यकर्त्यांनी पदयात्रेचे जंगी स्वागत केले. रोशनगेट ते आझाद चौक रस्त्यावर पदयात्रेमुळे जबरदस्त वातावरणनिर्मिती झाली होती. आझाद चौक येथून पदयात्रेला सुरुवात झाली. राजेंद्र दर्डा यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजराने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, राजेंद्र दर्डा यांनी या भागातील प्रत्येक घरात जाऊन घातलेल्या मतदानाच्या सादेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
किराडपुरा, इब्राहीम मशीद, रोशन मशीद, तलाववाडी इ. भागांमध्ये पदयात्रेला स्थानिक रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत काही कार्यकर्त्यांनी राजेंद्र दर्डा यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. युवकांचा उत्साह पाहता संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. आझाद चौक ते रोशनगेटवर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेत परिसरातील नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चिश्तिया कॉलनी, आविष्कार कॉलनीत घरोघरी भेटी
राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज चिश्तिया कॉलनी, आविष्कार कॉलनी, संभाजी कॉलनीत पोहोचली. या भागातील प्रत्येक घरात जाऊन घातलेल्या मतदानाच्या सादेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिश्तिया कॉलनीतून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा पुढे आविष्कार कॉलनीत दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. राजेंद्र दर्डा यांनी थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. महाराणा प्रताप चौकातून हनुमाननगर, सिंहगड कॉलनी, साईनगर परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने सिडकोत जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृह उभारण्यात आले. या नाट्यगृहामुळे सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली. कलाकार, रसिक आणि नागरिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना सिडकोतील रहिवासी अनिल कोमटकर यांनी व्यक्त केली.
जुन्या आठवणींना उजाळा
पदयात्रेदरम्यान काही जुन्या कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांनंतर भेट झाली. तेव्हा राजेंद्र दर्डा यांनी त्यांची गळाभेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भागात राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या विकासकामांमुळे येथील रहिवाशांचे राहणीमान उंचावले असल्याची प्रतिक्रिया त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
अयोध्यानगर, सुराणानगर भागात आज पदयात्रा
राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज सकाळी ८.३० वाजता वॉर्ड क्र. २५ अयोध्यानगर, १९ शिवनेरी कॉलनी, २६ गणेशनगर, एन- ८, सिडको भागात काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून पदयात्रेला सुरुवात होईल.
४सायंकाळी ५ वाजता वॉर्ड क्र. २४, एन-१ सिडको, सुराणानगर या भागातून काढण्यात येणारी पदयात्रा गणपती मंदिरापासून सुरुवात होईल. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.