शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

आम्ही मराठी पोरं हुश्शार; महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी अंतराळात उपग्रह सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 1:40 PM

Students in municipal schools will launch satellites एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च इंडियाअंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्पासाठी निवड

ठळक मुद्दे महापालिका शाळांच्या शिरपेचात मानाचा तुरामहापालिकेच्या शाळेतील १० विद्यार्थ्यांची निवड झाली

औरंगाबाद : एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च इंडियाअंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्पाद्वारे १०० उपग्रह तयार करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी महापालिकेच्या शाळेतील १० विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण सध्या सुरू आहे. औरंगाबादकरांसाठी ही गौरवाची बाब मानली जात असून, मराठी शाळेतील पोरांना अंतराळज्ञान मिळणार आहे.

हे सर्व उपग्रह ७ फेब्रुवारीला अंतराळात सोडून जागतिक विक्रम स्थापित केला जाणार आहे. यासाठी देशातील १०० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात महापालिकेच्या शाळांतून १० विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाने कळविले आहे. आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनची स्थापना हाऊस ऑफ कलामतर्फे ११ ऑक्टोबर २०१५ रोजी करण्यात आली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांमधील शिक्षण व कौशल्य, व्यवस्थापन, ज्ञान विकसनाची क्षमता, नोकरीच्या संधी शोधणे, संशोधन विकसित करणे हा आहे. महाराष्ट्रातील मुलांसाठी याअंतर्गत होणारी सर्व सत्रे मराठी भाषेतून होत आहेत. उपग्रह बनविण्यापासून ते अवकाशात प्रक्षेपित करीपर्यंत सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठीमधून दिली जात आहे.

या विद्यार्थ्यांची झाली आहे निवडनिवड झालेल्या विद्यार्थ्यांत उस्मानपुरा येथील प्रियदर्शनी शाळा, हर्सूल, मुकुंदवाडी, एन-७ या शाळांमधील सोनाली यादव, सूरज जाधव, विशाल वाहुळ, गुलनाज सय्यद, राणी चोपडे, नंदिनी मोटे, प्रतिमा म्हस्के, साहिल केदारे, इरशाद खान व रूपाली गायकवाड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही सर्व मुले रामेश्वरम येथे उपग्रह प्रक्षेपणासाठी जाणार आहेत. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च या फाऊंडेशनचे समन्वयक मिलिंद चौधरी आणि मनीषा चौधरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे.

३८ हजार मीटर उंचीवर सोडणार उपग्रहजगात सर्वांत कमीत कमी २५ ग्रॅम वजनाचे ते जास्तीत जास्त ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर सायंटिफिक बलूनद्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. यामध्ये पालिका विद्यार्थ्यांंचाही सहभाग असणार आहे. या उपक्रमासाठी उपायुक्त सुमंत मोरे, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे व सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार हे मार्गदर्शन करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादscienceविज्ञानAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाStudentविद्यार्थी