शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

किनवटमध्ये पाणीसंकट

By admin | Updated: June 5, 2014 00:13 IST

गोकुळ भवरे, किनवट उन्हाळ्यात भासणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ८७ लाख ९६ हजार रुपये किमतीचा आराखडा मंजूर झाला़

गोकुळ भवरे, किनवट उन्हाळ्यात भासणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ८७ लाख ९६ हजार रुपये किमतीचा आराखडा मंजूर झाला़ मात्र यात नमूद कामांना अद्याप सुरुवात झाली नसल्याने हा आराखडा कागदावरच आहे़ मारेगाव (वरचे) येथे सहा दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला़ मात्र टँकरग्रस्त धानोरा (सी़), रामपूर-भामपूर व शिवशक्तीनगर (घोगरवाडी) या तीन गावांचा टँकरचा प्रस्ताव प्रस्तावित आहे़ आता पावसाळ्यात टँकर सुरू करणार का? असा प्रश्न टंचाईग्रस्त गावचे नागरिक विचारत आहेत़ किनवट या डोंगराळ तालुक्यात १९१ गावे १०५ वाडीतांडे आहेत़ २०१३ च्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात म्हणावी तशी पाणीटंचाई उद्भवली नाही़ तरीपण पावसाचे पडणारे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता येथील जमिनीत नसल्याने दरवर्षी काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसताताच़ २०१३ च्या पावसाळ्यात इस्लामपूर भागात केवळ ७५ टक्क्यांच्या आतच पर्जन्यमान झाल्याने एप्रिलनंतर या भागात पाणीटंचाईचे संकट ओढवेल, असा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाचा होता़ आणि तो खराही ठरला़ कारण मार्लागुंडा, दीपलानातांडा, चंदूनाईक तांडा, मानसिंगनाईकतांडा, गोंडमहागाव, दुर्गानगर, शिवनगाव, रामन्नातांडा, व्यंकटापूर, मलकाजांबतांडा, आमरासिंग नाईकतांडा, दत्तनगर (मलकजांब), पांगरी, इरेगाव, सावरगावतांडा यासह तालुक्यातील वडोली, झेंडीगुडा, नागझरी, नागझरी कॅम्प, बेंदीतांडा, चिंचोलीतांडा, दाभाडी, नागरसवाडी, पेंदा, आंजी, लकडकोट, प्रधानसांगवी, घोटी, रायपूरतांडा, दुर्गापेठ, मोहाडा, लिमगुडा, पिंपळगाव फाटा, पिंपरगाव (की़) या गावांना टंचाईचे चटके बसू लागल्याने विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पं़ स़ च्या पाणीपुरवठा विभागाकडे आले़ विहीर अधिग्रहणाचे एकूण ४० प्रस्ताव आले़ हा आकडा ४७ वर जाण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला़ उल्लेखनीय म्हणजे, गतवर्षीचे पाणीटंचाई काळातील हातपंप दुरूस्तीचे १ लाख ५० हजार रुपये, बैलगाडीचे १ लाख रुपये, विहीर अधिग्रहणाचे २ लाख आणि टँकर चालकाचे ४० हजार रुपये असे ४ लाख ९० हजार रुपये बजेटच नसल्याने अडकूनच असल्याने विहीर अधिग्रहण करायला शेतकरी मागेपुढे पाहत आहेत़ नवीन विंधन विहिरी घेणे यासाठी ४२ प्रस्ताव प्राप्त झाले़ सर्वेक्षणही झाले़ ३२ प्रस्तावाचे आदेश प्राप्त होवून मंजुरी मिळाली़ पण कामांना काही सुरुवात नाही़ पावसाळ्याच्या तोंडी टंचाईची कामे करून निधीची वाट लावली जाते हे दरवर्षीचे चित्र आहे़ पैनगंगा नदीकाठावरील रामपूर-भामपूर, धानोरा (सि़) व अतिदुर्गम भागातील शिवश्क्तीनगर (घोरगवाडी) या टंचाईग्रस्त व टँकरग्रस्त गावांना टँकर केव्हा सुरू होणार, पावसाळा सुरू व्हायला सहाच दिवस शिल्लक असताना टँकर सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने तशा गावात मात्र पाणीटंचाईची भीषण समस्या उद्भवू लागली आहे़ हदगाव तालुक्यातील चित्र यापेक्षा वेगळे नाही़ संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पंचायत समितीने जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी ८० लाख ६ हजार रुपये किमतीचा आराखडा जिल्हा प्रशसनाकडे पाठविला होता़ तेव्हा २३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या आराखड्याला मंजुरी दिली़ एप्रिल ते जूनपर्यंत १ कोटी १९ लाख ११ हजार रुपये किमतीचा आराखडा पाठविला होता़ तेव्हा ६४ लाख ६ हजार रुपये मंजुरी मिळाली़ मंजुरी मिळूनही आराखड्यातील कामांना सुरुवातच नसल्याने आराखडा सध्यातरी कागदावरच आहे़