पावसाळ्यातच होणार पाणीपुरवठा सुरळीत

By Admin | Updated: May 21, 2014 01:14 IST2014-05-21T01:05:09+5:302014-05-21T01:14:09+5:30

औरंगाबाद : महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील दोषामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची घडी विस्कटली आहे.

Water supply will be done in the monsoon | पावसाळ्यातच होणार पाणीपुरवठा सुरळीत

पावसाळ्यातच होणार पाणीपुरवठा सुरळीत

 औरंगाबाद : महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील दोषामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची घडी विस्कटली आहे. त्याचे पडसाद आज सभेमध्ये उमटले. नियमित पावसाळा सुरू झाल्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे आज प्रशासनाने अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले. दोन ते तीन महिन्यांपासून शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे. असे असताना प्रशासन काहीही कार्यवाही करीत नसल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. महापौरांच्या वॉर्डातील व्हॉल्व्ह दुरुस्तीमुळे सिडको-हडकोचे पाणी बंद करण्यात आल्याच्या बातम्या छापून आल्या. सत्ताधारीच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडण्यास जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला. सभागृहातील काही विरोधी पक्षाच्या सदस्यांची नक्कल सत्ताधार्‍यांनी केली. पाण्यासाठी सदस्य मत मांडत असताना सत्ताधारी सदस्यांनी केलेला प्रकार पाहून महापौर तोंड दाबून हसल्या. त्यामुळे नगरसेवक संतापून म्हणाले, शहरात पाण्यासाठी ओरड सुरू आहे आणि तुम्हाला हसू येत आहे, ही चांगली बाब नाही.

Web Title: Water supply will be done in the monsoon