पाण्यासाठी वणवण

By Admin | Updated: July 24, 2014 00:14 IST2014-07-23T23:46:55+5:302014-07-24T00:14:04+5:30

जालना : शहरातील नवीन व जुना जालना भागात भर पावसाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Water distribution | पाण्यासाठी वणवण

पाण्यासाठी वणवण

जालना : शहरातील नवीन व जुना जालना भागात भर पावसाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळेही पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.
गतवर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे घाणेवाडी तलावात चांगला पाणीसाठा होता. कूपनलिकांनाही चांगले पाणी होते. यंदा पावसाने ओढ दिल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याची अवस्था चिंतनीय आहे. अनेक प्रभागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नवीन जालना विभागाला घाणेवाडी जलाशयातून तर जुना जालन्यात जायकवाडी येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. पैकी दोन विभागातील पंपहाऊसमध्ये पाणी असूनही नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या संपामुळे पाणीपुरवठ्यावर काहीअंशी परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भर पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने तीव्र नाराजी आहे. अनेक प्रभागांत आठ ते दहा दिवसांपासून पाणी आलेले नाही. रमजान महिना व श्रावण मास लक्षात घेता सर्वच प्रभागांत नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. पावसाने ओढ दिल्याने कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. यामुळे विकतच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवी लागत आहे. (वार्ताहर)
खाजगी टँकरच्या फेऱ्या वाढल्या
जून महिन्यांपर्यंत बंद असलेले खाजगी टँकर आता पुन्हा दिसू लागले आहेत. नगर पालिकेने नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरत आहे. खाजगी टँकर चालकांनीही काही अंशी दर वाढविल्याने नागरिक चिंतातुर आहेत.

Web Title: Water distribution