पाणलोट कामामध्ये गैरव्यवहार; तिघे निलंबित

By Admin | Updated: November 18, 2015 00:41 IST2015-11-18T00:22:43+5:302015-11-18T00:41:20+5:30

माजलगाव : कृषी विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणलोट विकास कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तक्रारीनुसार विभागीय चौकशीत

Wastewater scams; Suspended all three | पाणलोट कामामध्ये गैरव्यवहार; तिघे निलंबित

पाणलोट कामामध्ये गैरव्यवहार; तिघे निलंबित


माजलगाव : कृषी विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणलोट विकास कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तक्रारीनुसार विभागीय चौकशीत विभागीय कृषी संचालक आर. एस. भताने यांनी संबंधित तीन कर्मचाऱ्यांचे मंगळवारी निलंबन केले.
तालुका कृषी कार्यालयांतर्गत असलेल्या तालखेड कृषी पर्यवेक्षक कार्यालयातील पी. एन. चव्हाण, के. डी. मुंडे व कृषी सहायक एम. पी. शिशोदे यांच्या कार्यकाळात कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात गैरव्यवहार झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. कार्यालयामार्फत वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे.
कृषी सहायक एम. पी. शिशोदे हे जालना जिल्ह्यातील कृषी कार्यालयात सध्या कार्यरत आहेत. कृषी कार्यालयात पाणलोट क्षेत्राच्या व जलयुक्त शिवारच्या कामात माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाली असल्याने संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Wastewater scams; Suspended all three