शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

आज मतदान

By admin | Updated: December 18, 2015 23:49 IST

वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी शनिवारी मतदान होणार असून ७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी शनिवारी मतदान होणार असून ७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बजाजनगरचा समावेश वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेला आहे. गत दशकभरापासून या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असून, सेनेतून एका गटाने वर्षभरापूर्वी आ. संजय शिरसाट व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजपात प्रवेश केला आहे. सेना-भाजप स्वतंत्रपणे तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या चार पक्षांबरोबर मनसे तसेच काही सामाजिक व कामगार संघटनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे चुरस वाढली आहे. अशातच शिवसेनेने मावळत्या सदस्यांना या निवडणुकीत डच्चू दिल्यामुळे या सदस्यांत नाराजीचा सूर असून निष्ठावंत कार्यकर्त्यांत धुसफूस सुरू आहे. सेनेला सोडचिठ्ठी दिलेले जवळपास सर्वच सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना तिकिटे दिल्यामुळे सेनेसमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जिंकून येण्याची शक्यता असलेल्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. धनाढ्य व प्रबळ उमेदवारांनी मतदारांची मर्जी राखण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला असून, विविध प्रभागांतील नागरी समस्या सोडविण्यासाठी अलीकडच्या काही दिवसांत पुढाकार घेतला. याशिवाय सामाजिक उपक्रम व मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देऊन विविध कामे करण्याचे आश्वासन मतदार व ट्रस्टींना देण्यात आल्याची चर्चा आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवाराकडून मतदारांना पोलचिटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. एकगठ्ठा मतांसाठी विविध प्रकारची आमिषे दाखवून व आर्थिक देवाणघेवाण करून मतदारांना आकर्षित करण्याचे फंडे ‘सक्षम’ उमेदवारांनी सुरू केल्याची चर्चा आहे. ३० हजार ७४६ मतदारांसाठी ४० बूथ या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी ७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या निवडणुकीत ३० हजार ७४६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यात १८ हजार ३० पुरुष, तर १२ हजार ७१६ महिला मतदार आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये ३ हजार २७६, प्रभाग क्रमांक २ मध्ये ४ हजार ४६५, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ६ हजार ८५८, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ३ हजार ९५०, प्रभाग क्रमांक ५ मध्ये ६ हजार ७०८ तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये एकूण ५ हजार ४८९ मतदार आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ४० बूथवर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पवार, सहायक सुदाम शेंगुळे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी गटविकास अधिकारी विजय परदेशी, विस्तार अधिकारी शिवाजी साळुंके, ग्रामविकास अधिकारी ए. के. गायकवाड, एम. ए. पठाण यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन आढावा घेतला.