शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोहीम संपल्यावर मतदार नोंदणी अर्जांचा पुरवठा

By admin | Updated: July 2, 2014 01:03 IST

औरंगाबाद : मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान ठिकठिकाणी नोंदणी अर्जांचा तुटवडा जाणवत होता.

औरंगाबाद : मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान ठिकठिकाणी नोंदणी अर्जांचा तुटवडा जाणवत होता. मात्र, तेव्हा तहसील कार्यालयाकडे अर्ज उपलब्ध नव्हते. नोंदणी मोहीम संपल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने तहसील कार्यालयाला नोंदणीचे अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. मोहिमेदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) दुरुस्ती आणि स्थलांतराचे अर्जच नव्हते. तर नोंदणीचे अर्जही मोजकेच होते. त्यामुळे असंख्य नागरिकांना नोंदणी मोहिमेदरम्यान मतदान केंद्रांवरून परत जावे लागले. तर काही ठिकाणी नागरिकांनी अर्जांच्या झेरॉक्स विकत घेऊन अर्ज भरले. ३० जून रोजी मोहीम संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने आज तहसील कार्यालयाला मतदार नोंदणीच्या अर्जांचा पुरवठा केला. याविषयी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांना विचारले असता त्यांनी उपलब्ध अर्जांचे आधीही तहसील कार्यालयाला वितरण करण्यात आले होते. आता आणखी अर्ज उपलब्ध झाले असतील म्हणून त्याचा पुरवठा करण्यात आला असे सांगितले. अहवालाचा प्रवास कासवगतीनेजिल्ह्यात २८ आणि २९ जून रोजी मतदान केंद्रांवर नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी सर्व केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी बीएलओ पोहोचलेच नाहीत. अशा बीएलओंवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार सर्व तालुक्यांकडून अहवाल मागविण्यात आला होता. मात्र, अद्यापही हे अहवाल प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.