मुख्यमंत्र्यांची वडवणी येथील छावणीला भेट

By Admin | Updated: September 4, 2015 00:20 IST2015-09-04T00:20:08+5:302015-09-04T00:20:08+5:30

वडवणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्यात समावेश नसतानाही त्यांनी येथे बाबरी मुंडे यांच्या चारा छावणीला भेट दिली.

Visit the Chief Minister's camp in Wadwani | मुख्यमंत्र्यांची वडवणी येथील छावणीला भेट

मुख्यमंत्र्यांची वडवणी येथील छावणीला भेट

वडवणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्यात समावेश नसतानाही त्यांनी येथे बाबरी मुंडे यांच्या चारा छावणीला भेट दिली.
पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. आर. टी. देशमुख, रमेश आडसकर, माजी आ. केशव आंधळे, राजाभाऊ मुंडे, मच्छिंद्र झाटे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चारा छावणीविषयी माहिती घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी उपाययोजना मोठ्या वेगाने सुरू आहेत. शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार सक्षमपणे काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Visit the Chief Minister's camp in Wadwani