शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विहीर वाटपात नागरिकांना धरले वेठीस!

By admin | Updated: May 9, 2016 23:54 IST

आष्टी : राज्य शासनाने मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन मजुरांना रोजगार मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीरी मंजूर केल्या.

आष्टी : राज्य शासनाने मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन मजुरांना रोजगार मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीरी मंजूर केल्या. त्यामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती विभातील प्रमुख अधिकारी हे विहीर वाटपात अर्थपूर्ण व्यवहार करू लागले असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम प.सं.चे अधिकारी, सभापती करत आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आष्टी पंचायत समिती मार्फत २३२ विहिरींची मंजुरी देण्यात आली आहे. त्यात गटविकास अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर ठेऊन फक्त ग्रामसेवकांच्या सहीनेच ठराव घेऊन विहिरींना मंजुरी दिली. यादी जाहिर केल्यावर बऱ्याच सरपंचाना कळाले आपण यांचा ठरावही दिला नाही तरीही या विहीरी मंजूर कशा झाल्या ? अन् मग काय सरपंचाची पळापळी सुरू झाली.विहिरी वाटपात अनियमितता दाखवून मंजूर करण्यात आल्या आहेत आणि सगळ्याच गोष्टींचा बट्ट्याबोळ झाला. गटविकास अधिकाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला. नंतर त्यांनी सर्वांना एखाद्या राजकीय पुढाऱ्याप्रमाणे आणखी ५०० विहिरी मंजूर करणार असल्याचे सांगून बऱ्याच शेतकऱ्यांना तांत्रिक मान्यता, भूजलसाठी पत्र दिले तसेच शेतकरी व पदाधिकाऱ्यांना नादी लावण्याचे काम केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)