शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरुंचे बोल ठरले खोटे

By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST

नजीर शेख, औरंगाबाद विद्यापीठातील ‘लोकमत’ ने उघडकीस आणलेल्या पीएच. डी. घोटाळ्याप्रकरणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी चार आजी, माजी कुलगुरूंनी समिती नेमल्याचे जाहीर केले.

नजीर शेख, औरंगाबादतीन महिन्यांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘लोकमत’ ने उघडकीस आणलेल्या पीएच. डी. घोटाळ्याप्रकरणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी चार आजी, माजी कुलगुरूंनी समिती नेमल्याचे जाहीर केले. मात्र, कुलगुरूंनी अशी कोणतीही समितीच नेमली नसल्याचे समोर आले असून, घोटाळा दडपण्यासाठी कुलगुरू चक्क खोटे बोलल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यापीठातील पीएच.डी.चा बाजार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. विद्यापीठातील आणि महाविद्यालयांतील अनेक गाईड हे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करून पीएच.डी. बहाल करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या मालिकेने समोर आणले होते. १ मार्च ते ८ मार्च या कालावधीत ही मालिका चालली. जालना येथील समाजकार्य महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेची या प्रकरणात गाईडशिपही रद्द झाली. याशिवाय विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील एका प्राध्यापिकेने चालविलेला विद्यार्थ्याचा छळ, मराठी विभागातील तसेच बीड येथील डॉ. एम. के. साबळे यांनी विद्यार्थ्यांकडून पीएच. डी. च्या बदल्यात विमा पॉलिसी उतरवून घेतल्याचे प्रकरणही या मालिकेद्वारे समोर आले होेते. मराठी विषयात पीएच.डी.साठी डॉ. भारत हंडिबाग यांनी एक लाख रुपये मागितल्याचे तसेच त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे प्रकरणही उजेडात आणले होेते. विद्यापीठातील अनेक प्राध्यापक ५० हजार ते तीन लाखांपर्यंतची रक्कम वसूल केल्याशिवाय पीएच.डी. पूर्ण करवून घेत नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता. याप्रकरणी कुलगुरूडॉ. चोपडे यांनी पीएच. डी. च्या घोटाळ्याप्रकरणी चार आजी, माजी कुलगुरूंची समिती नेमल्याचे जाहीर केले. या समितीत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. माणिकराव साळुंके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एम. माळी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग यांचा समावेश असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली होती. याच वेळी मार्च महिन्यात समोर आलेल्या आणि पीएच. डी. घोटाळ्यांबरोबरच याआधी आर्थिक व्यवहार होऊन दिलेल्या पीएच. डी. प्रकरणांचाही छडा लावला जाईल, असे डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले होते. कुलगुरूंनी समिती जाहीर केल्यानंतर समितीतील सदस्यांना चौकशी करण्यासंदर्भात पत्र पाठविणे, त्यांची सहमती घेणे, त्यांना कार्यकक्षा आणि अधिकार ठरविणे यासंबंधी काहीच धोरण ठरविण्यात आले नाही. विद्यार्थ्यांकडून पीएच.डी.साठी पैसे उकळणाऱ्या प्राध्यापकांच्या अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे पीएच.डी.चा बाजार मांडणाऱ्या गाईडना ना धाक राहिला, ना त्यांच्यावर कोणती कारवाई झाली. चौकशी समितीची घोषणा ही फसवी ठरली.