शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

वाजतगाजत महालक्ष्मीचे आगमन

By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST

औरंगाबाद : परिवारातील सर्व जण पारंपरिक गाणे गात होते आणि सुवासिनी सजविलेल्या परातीत महालक्ष्मीचे मुखवटे घेऊन चालत होत्या...

औरंगाबाद : परिवारातील सर्व जण पारंपरिक गाणे गात होते आणि सुवासिनी सजविलेल्या परातीत महालक्ष्मीचे मुखवटे घेऊन चालत होत्या... वाजतगाजत महालक्ष्मी घरात आणण्यात आल्या. श्री गणेशापाठोपाठ महालक्ष्मीचेही घराघरांत आगमन झाल्याने सर्वत्र मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.भाद्रपद शुद्ध सप्तमीला महालक्ष्मीचे आगमन झाले. भाद्रपद शुक्ल पक्षाच्या ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन होत असल्यामुळे त्यांना जेष्ठा गौरी असेसुद्धा म्हटले जाते. गणेशोत्सवाच्या काळात येणारा हा सण गौरी गणपती म्हणूनही ओळखला जातो. कुठे दुपारी, तर कुठे सायंकाळच्या वेळी महालक्ष्मी वाजत-गाजत आणण्यात आल्या. यंदा महालक्ष्मीच्या साजशृंगारात ‘जय मल्हार’ मालिकेतील दागिन्यांचा प्रभाव दिसून आला. काही जणांनी खास म्हाळसेचे कानातले, बानूची नथ, वेल, बांगड्या खरेदी करून महालक्ष्मीला सजविले होते. उद्या रविवारी २० रोजी महालक्ष्मीची पूजा व आरती करण्यात येणार आहे.