शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

तीन मतदारसंघांत व्हीव्हीपॅटचा वापर

By admin | Updated: September 13, 2014 00:36 IST

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत काही निवडक मतदारसंघांमध्ये व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) नावाचे यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत काही निवडक मतदारसंघांमध्ये व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) नावाचे यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांना मतदान नोंदविले गेल्यानंतर लगेचच त्याची प्रिंटआऊटही दिसणार आहे. औरंगाबाद शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम या तीन मतदारसंघांत व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. परिणामी, येथील मतदारांना त्यांचे मतदान बरोबर नोंदविले गेले की नाही हे तपासता येणार आहे. निवडणूक आयोगातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीव्हीपॅटसंदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील सुमारे ३५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आयोगाचे सचिव के.एन. भार यांनी हे प्रशिक्षण दिले.प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी त्याची माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, स्वाती कारले, रिता मेत्रेवार, तहसीलदार विजय राऊत यांची उपस्थिती होती. विक्रमकुमार यांनी सांगितले की, आयोगातर्फे राज्यात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होत आहे. औरंगाबाद, नाशिक, अहमदनगरसह अमरावती, नागपूर जिल्ह्यांतील काही निवडक मतदारसंघांत हा वापर होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीन मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रासोबतच हे व्हीव्हीपॅट बसविले जाईल. त्यामुळे मतदाराने मतदान यंत्रावरील बटन दाबल्यावर लगेच त्याला त्याची प्रिंटआऊट दिसेल. मात्र, ती त्याला मिळणार नाही. हे व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्र शेजारीशेजारी एकाच कंपार्टमेंटमध्ये असेल. त्यामुळे मतदानाची प्रिंट मतदाराव्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही दिसू शकणार नाही.प्रिंटआऊट दिसणार असल्यामुळे मतदाराला आपले मतदान बरोबर झाले की नाही, याची खातरजमा करता येणार आहे. खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध फौजदारीयंत्रावरील बटन दाबल्यानंतर बरोबर त्याच व्यक्तीला मतदान झाले की नाही हे मतदाराला लगेचच कळू शकणार आहे. चुकीचे मतदान नोंदविले गेल्याचे आढळून आले, तर मतदाराला त्याच ठिकाणी आक्षेप नोंदविता येणार आहे. मात्र, खोडसाळपणे आक्षेप नोंदविल्यास त्याविरुद्ध कारवाई होणार आहे.