शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात युरियाचे ‘शॉर्टेज’ !

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली.

उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली. ही पिके वाढीला लागली आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी युरिया खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करीत आहेत. मात्र दुकानदारांकडून नकारघंटा ऐकायला मिळत आहे. जिल्हाभरात युरियाचे शॉर्टेज निर्माण झाले असताना कृषी विभाग मात्र झोपेत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.रबी हंगामासाठी कृषी विभागाकडून ८२ हजार ८०० मे टन इतक्या खताची मागणी करण्यात आली होती. मात्र आजवर ६ हजार ५६६ मे टन खत उपलब्ध झाले आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक तालुक्यात सध्या पेरणीलाही सुरुवात झाली नाही. तर काही भागामध्ये बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. या परिस्थितीमुळे डीएपी, एमओपी, एनपीके अशा खतांना फारशी मागणी नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी पाणी देवून पिके जोपासत आहेत. पिकांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी, यासाठी युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात युरियाच उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आजवर अवघा ९६२ मे. टन एवढाच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी जेरीस आला असताना दुसरीकडे कृषी विभागाचे दूर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारी येवू लागल्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने कृषी विभागात जावून जबाबदार अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनाही नेमकं जिल्ह्यात चालले काय? याची खबरबात नव्हती. जिल्ह्यात किती मे. टन युरिया आला आहे याचीही साधी माहिती मोहीम अधिकाऱ्याकडे नव्हती. शेतकरी युरियासाठी दुकानदाराचे उंबरठे झिजवत असतानाही कृषी विभागाला याचे काहीच सोयरसुतक नाही हेच या प्रकारातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षित धोरणांबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)