अक्षिताने जिद्दीने मिळविले यश

By Admin | Updated: June 18, 2014 01:31 IST2014-06-18T00:55:46+5:302014-06-18T01:31:06+5:30

हिंगोली : घरातएकत्र कुटूंब पद्धतीतही अभ्यासातील एकाग्रता टिकवून ठेवत हिंगोलीतील अक्षिता साहूने जिद्दीच्या जोरावर दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण मिळविले.

Untimely success | अक्षिताने जिद्दीने मिळविले यश

अक्षिताने जिद्दीने मिळविले यश

हिंगोली : घरातएकत्र कुटूंब पद्धतीतही अभ्यासातील एकाग्रता टिकवून ठेवत हिंगोलीतील अक्षिता साहूने जिद्दीच्या जोरावर दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण मिळविले.
हिंगोली येथील सरजुदेवी विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षिता साहू हिच्या घरी एकत्र कुटूंब पद्धती असल्याने कुटूंबातील सदस्यांची संख्या अधिकच आहे. त्यामुळे दहावीच्या परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी अक्षिताने मध्यरात्रीची वेळ निवडली. रात्री ११.३० वाजता अभ्यास सुरू केल्यानंतर जवळपास अडीच ते तीन वाजेपर्यंत अक्षिताचा अभ्यास सुरूच रहायचा. वडिल राजू साहू यांनी अक्षिताला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. आईनेही अक्षिताच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. शाळेच्या वतीने घेण्यात आलेले विशेष सरावाचे वर्ग अक्षितासाठी महत्वाचे ठरले, असल्याचे तिने सांगितले. अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास यश संपादन करता येते, असे तिने सांगितले. अक्षिताला गणिताची आवड असून सीए व्हायचे तिचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची तिची तयारी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Untimely success