शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट’साठी विद्यापीठ यंत्रणा सज्ज

By admin | Updated: September 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : पीएच.डी.साठी तिसरी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) २८ सप्टेंबर रोजी शहरातील १७ केंद्रांवर घेतली जाणार असून, या परीक्षेला ९ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

औरंगाबाद : पीएच.डी.साठी तिसरी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) २८ सप्टेंबर रोजी शहरातील १७ केंद्रांवर घेतली जाणार असून, या परीक्षेला ९ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची यंत्रणा सज्ज झाली आहे. यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी सांगितले की, कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी ‘पेट’ वेळेत घेण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने ५५ विषयांसाठी २८ सप्टेंबर रोजी ‘पेट’ घेण्याचा निश्चय केला. या परीक्षेला ९ हजार २१७ विद्यार्थी बसले आहेत. शहरातील देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, मौलाना आझाद कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, ‘जेएनईसी’, स.भु. विज्ञान महाविद्यालय, माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय, इं.भा. पाठक महिला महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, वाय.बी. चव्हाण फार्मसी महाविद्यालय, मिलेनियम इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, एमआयटी (बी.टेक.) व एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात या १५ केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सकाळचे सत्र आणि दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत दुपारच्या सत्रात दोन पेपर घेतलेजातील. या परीक्षेचा निकाल १० दिवसांत जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे, या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत विद्यार्थ्यांना वितरित करण्याची तरतूद नियमात नाही. त्यामुळे उत्तरांची कार्बन कॉपी त्याच दिवशी परीक्षा संपल्यानंतर वेबसाईटवर टाकली जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपण कुठे कमी पडलो, याची सत्यता पडताळता येईल. उद्या १७ सप्टेंबर रोजी परीक्षेचे हॉल तिकीट वेबसाईटवर टाकले जाणारआहे.