शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

बाभुळगाव ग्रामपंचायत निवडणुकीवर केंद्रीय राज्यमंत्र्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST

बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बाभुळगाव (बु.) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराला जाेर मिळाला आहे. आपलेच पॅनेल जिंकून येईल, यासाठी गावपुढारी ...

बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बाभुळगाव (बु.) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराला जाेर मिळाला आहे. आपलेच पॅनेल जिंकून येईल, यासाठी गावपुढारी आटापिटा करीत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भाची तथा विद्यमान सरपंच या निवडणुकीत पुन्हा नशीब अजमावत आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेेनेदेखील युवा कार्यकर्ता रिंगणात उतरविला आहे. या लढतीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष बाभुळगावच्या निवडणुकीकडे लागून आहे.

बाभुळगाव (बु.) ग्रामपंचायत ही सात सदस्यांची ग्रामपंचायत आहे. तर गावची लोकसंख्या अकराशे आहे. लक्ष्मीमाता ग्रामविकास पॅनेल विरुद्ध जय बजरंग दल ग्रामविकास पॅनेल यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. सात जागांसाठी एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आली आहे. दोन्ही पॅनेलकडून विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्यासह तीन विद्यमान सदस्य, तर एका विद्यमान सदस्याच्या सौभाग्यवती व एका विद्यमान सदस्याची सून पुन्हा निव़डणुकीच्या रिंगणात आमने-सामने आले आहेत. विरोधी पॅनेलच्या उमेदवारांशी बोलणे बंद करणे, एकमेकांबद्दल कटुता निर्माण केली जात आहे. मात्र, बाभुळगाव (बु) हे गाव त्यापासून अलिप्त आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुकीचा प्रचार केला जात आहे. त्यात तिन्ही वाॅर्डमध्ये ६०८ मतदान असल्यामुळे ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरू असून नाराज असलेल्या मतदारांना राजी केले जात आहे.

---

केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांची भाची रिंगणात

बाभुळगाव ग्रामपंचायतीतील वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये सर्वसाधारण जागेवर शिवसेना शाखाप्रमुख प्रभाकर काशिनाथ वाहटुळे यांच्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भाची व विद्यमान सरपंच कौशल्याबाई काकासाहेब फरकाडे या उभ्या आहेत. त्यामुळे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी अस्तित्वाची लढाई म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे. संपूर्ण तालुक्याचे याकडे लक्ष लागून आहे. एकाअर्थाने शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना येथे दिसून येत आहे, तर केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचे देखील या निवडणुकीवर लक्ष आहे.

-------

चौकट :

वाॅर्ड क्रमांक एक : १७७, वाॅर्ड क्रमांक दोन : २६६, तर वॉर्ड क्रमांक तीनमध्ये १६५ मतदान असून संपूर्ण गावात एकूण ६०८ असे मतदान आहे.