शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती असुविधांच्या गर्तेत

By admin | Updated: July 26, 2014 00:40 IST

संतोष शिंदे, वाटेफळ परंडा तालुक्यातील वाटेफळ येथील दलित वस्तीत २५ वर्षापूर्वी विद्युतपोल उभारण्यात आले आहेत. मात्र अद्यापही तारा न ओढल्याने ही वस्ती अंधारात आहे.

संतोष शिंदे, वाटेफळपरंडा तालुक्यातील वाटेफळ येथील दलित वस्तीत २५ वर्षापूर्वी विद्युतपोल उभारण्यात आले आहेत. मात्र अद्यापही तारा न ओढल्याने ही वस्ती अंधारात आहे. येथे लाखो रुपये खर्चून राबविलेली पाणीपुरवठा योजनाही कुचकामी ठरली असून, नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत.वाटेफळ येथील दलित वस्तीत २५ वर्षापूर्वी विद्युतपोल उभारण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत या पोलवरती तारा ओढलेल्या नसल्याने ही वस्ती अंधारातच आहे. घरगुती वीज कनेक्शन घ्यावयाचे असल्यास शेजारच्या गल्लीतील पोलवरुन घ्यावे लागत असल्याने वस्तीतील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनेकांनी अद्यापही वीज कनेक्शन घेतले नसल्याचे दिसून येते. वस्तीतील पोलवर तारा ओढून विद्युत पुरवठा जोडून देण्याची येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासून मागणी आहे. मात्र याकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते. येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. गावातील काही भागात विविध योजनांच्या माध्यमातून पाणी टाक्या देण्यात आल्या आहेत. मात्र या वस्तीत एकही टाकी नसल्याने महिलांना जीव मुठीत धरुन आडातील पाणी शेंदून आणावे लागते. या आडाला असलेले दोन्ही रहाटही मोडकळीस आले आहेत. त्यातच आडाचा कट्टाही अर्धवट तुटलेला असल्याने पाणी शेंदताना महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)लाखोंची योजना कुचकामी २००१ मध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेंतर्गत येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. वस्तीतील कुटुंबांनी ग्रामपंचायतीकडे रीतसर पावती फाडून नळ कनेक्शन घेतले. या योजनेतील नळाद्वारे वस्तीतील नागरिकांना सुमारे दोन महिने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र त्यानंतर या टाकीत पाणी न सोडल्याने लाखो रुपये खर्चून सुरु केलेली ही योजनाही कुचकामी ठरल्याचे दिसून येते. वस्तीमध्ये ३ हातपंप घेण्यात आले असले तरी सद्यस्थितीत त्यातील एकही हातपंप सुरु नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.