युनानी, आयुर्वेद डॉक्टरही करतील अ‍ॅलोपथीची प्रॅक्टिस

By Admin | Updated: June 17, 2014 01:10 IST2014-06-17T00:56:08+5:302014-06-17T01:10:27+5:30

औरंगाबाद : आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याच्या परवानगीवर आता कायद्याचेही शिक्कामोर्तब झाले.

Unani, Ayurveda doctor will do the Allopathy Practice | युनानी, आयुर्वेद डॉक्टरही करतील अ‍ॅलोपथीची प्रॅक्टिस

युनानी, आयुर्वेद डॉक्टरही करतील अ‍ॅलोपथीची प्रॅक्टिस

औरंगाबाद : आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याच्या परवानगीवर आता कायद्याचेही शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे (निमा) माजी अध्यक्ष तथा भारतीय चिकित्सा सेंट्रल कौन्सिलचे सदस्य डॉ. सुधाकर मोहिते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत
दिली.
डॉ. मोहिते म्हणाले की, आयुर्वेद आणि युनानीचा अभ्यासक्रम हा सर्वसमावेशक आहे. त्यामुळे या पॅथीच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देणारा अध्यादेश १९९२, १९९८, २००४ आणि २००९ मध्ये काढला होता. मात्र, अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे, अशी संघटनेची मागणी होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करावी, यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा केला.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्टमध्ये सुधारणा विधेयक मंजूर केले. यामुळे निमा संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले आहे, असे मोहिते म्हणाले.
आतापर्यंत युनानी आणि आयुर्वेद डॉक्टर शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, शालेय आरोग्य तपासणी अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करीत आहेत. केवळ कायद्याचे संरक्षण आवश्यक होते, त्यासाठी ही मागणी लावून धरली होती, असे डॉ. मोहिते यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे प्रवक्ता डॉ. गिरीश डागा, डॉ. जगदीश गिते, डॉ. आर.एम. मुंदडा, डॉ. प्रकाश न्यायाधीश, डॉ. सुनील वानखेडे, डॉ. मिलिंद पोळ, डॉ. विनय धर्माधिकारी, डॉ. एस.एल. राठी, डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते.

Web Title: Unani, Ayurveda doctor will do the Allopathy Practice