खळबळजनक! पगारिया ऑटोचे शटर तोडून दोन तिजोऱ्या पळवल्या; १५ लाखांची रोकड लंपास 

By राम शिनगारे | Updated: August 4, 2022 12:32 IST2022-08-04T12:32:26+5:302022-08-04T12:32:43+5:30

पळवून नेलेल्या दोन तिजोऱ्या शहरापासुन जवळच असलेल्या तिसगाव येथील उडानपुलाच्या खाली आढळून आल्या आहेत. 

Two safes were stolen by breaking the shutters of Pagaria Auto; 15 lakhs in cash looted | खळबळजनक! पगारिया ऑटोचे शटर तोडून दोन तिजोऱ्या पळवल्या; १५ लाखांची रोकड लंपास 

खळबळजनक! पगारिया ऑटोचे शटर तोडून दोन तिजोऱ्या पळवल्या; १५ लाखांची रोकड लंपास 

औरंगाबाद : पगारिया ऑटोमध्ये शटर तोडून तिजोरी पळवल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. येथील दोन तिजोऱ्या चोरट्यांनी पळवल्या असून त्यातील 15 लाखाची रोकड चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद शहरातील वाहन विक्रीचे सर्वात मोठे शोरूम असलेल्या पगारिया ऑटो शोरूमचा लोखंडी दरवाजा उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरटे पाठीमागील बाजूस असलेल्या दोन तिजोऱ्या पळवून घेऊन गेले. या तिजोऱ्यांमध्ये 15 लाख रुपयापेक्षा अधिक रोकड असल्याची माहिती पगारिया व्यवस्थापनाने दिली. दरम्यान, पळवून नेलेल्या दोन तिजोऱ्या शहरापासुन जवळच असलेल्या तिसगाव येथील उडानपुलाच्या खाली आढळून आल्या आहेत. 

दोन्ही तिजोऱ्या फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश अघाव, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. सीसीटीव्हीची सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: Two safes were stolen by breaking the shutters of Pagaria Auto; 15 lakhs in cash looted