शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाचे दोनशे कोटी थकले

By admin | Updated: July 15, 2016 01:11 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी वसुलीलाही बसला आहे. सिंचनाच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी वसुलीलाही बसला आहे. सिंचनाच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी थकबाकीचा आकडा वाढला आहे. सद्य:स्थितीत जलसंपदा खात्याचे सिंचन आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे तब्बल दोनशे कोटी रुपये थकले आहेत. जलसंपदा विभागाच्या धरणांमधून सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी (पिण्यासाठी, उद्योगांसाठी) पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता वेगवेगळ्या दराने पाणीपट्टी आकारली जाते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे. याशिवाय बिगर सिंचनाच्या थकीत पाणीपट्टीचा आकडाही वाढला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) च्या औरंगाबाद मंडळांतर्गत सद्य:स्थितीत सिंचन आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे तब्बल २०८ कोटी रुपये थकले आहेत. या मंडळांर्तगत औरंगाबाद, जालना आणि परभणी हे जिल्हे येतात.याशिवाय जायकवाडी धरणावरून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नेवासा या दोन तालुक्यांतील काही भागालाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ही सर्व पाणीपट्टी वरील तीन जिल्हे आणि शेवगाव व नेवासा ह्या दोन तालुक्यांमधील आहे. औरंगाबाद मंडळ कार्यालयांतर्गत जूनअखेरपर्यंत सिंचनाच्या पाणीपट्टीचे १०३ कोटी आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे १०८ कोटी रुपये थकले आहेत. बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीमध्ये उद्योगांबरोबरच ग्रामपंचायती, नगर परिषदा आणि मनपाच्या थकीत पणीपट्टीचा समावेश आहे. आता जलसंपदा विभागाकडून थकबाकीच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, १ एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत या कार्यालयाने ५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये सिंचनाची ४ लाख आणि बिगर सिंचनाची ५ कोटी ८५ लाख रुपये इतकी पाणीपट्टी आहे. चालू वर्षात सुमारे ३५ कोटी रुपयांची पाणीपट्टी आकारणी होण्याचा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनाची अपेक्षित पाणीपट्टी वसुली झाली नाही. आता सिंचन आणि बिगर सिंचन या दोन्ही पाणीपट्टींच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चालू वर्षाच्या पाणीपट्टीसोबतच थकबाकीचीही वसुली केली जाणार आहे. - जे. एन. हिरे, सहायक अधीक्षक अभियंता, कडा