शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसीय धान्य महोत्सव

By admin | Updated: May 11, 2014 00:38 IST

हिंगोली : कृषी व पणन विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे १३ व १४ मे रोजी धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

 हिंगोली : महाराष्टÑ शासनाच्या कृषी व पणन विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे १३ व १४ मे रोजी धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथील महावीर भवनात हा महोत्सव आयोजित केला असून, उत्पादक ते ग्राहक असा थेट संबंध निर्माण करण्याच्या हेतूने या महोत्सवाचा उपक्रम हाती घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकारचे धान्य व फळे तयार होतात. पारंपरिक पद्धतीने होणार्‍या शेतीमाल विक्रीत दलालांची मोठी साखळी कार्यरत असते. त्यामुळे या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी शेतकरी, उत्पादक आणि ग्राहक यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होण्याच्या हेतूने सदर धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अनेक प्रकारचे धान्यांचे जसे गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग, जवस, कारले इत्यादी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. त्यामध्ये विविध प्रकाराच्या वाणांची लागवड होते. याशिवाय हरभरा, तूर, उडीद, मूग यांच्या डाळीही शेतकरी गटाद्वारे उत्पादित केल्या जातात. तसेच कृषी मालाचे मूल्यवर्धित पदार्थ जसे हळद पावडर, मसाले, पापड, लोंची इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित करण्यात येत आहेत. या सर्व घटकांना शहरी ग्राहकांशी थेट संपर्क करण्याची संधी यानिमित्ताने शेतकरी उत्पादकाला मिळणार आहे. या धान्य व फळे महोत्सवात भाग घेऊ इच्छिणार्‍या शेतकरी गटाने आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करणे आवश्यक आहे. महोत्सवास ग्राहकांनीही भेट देऊन तसेच धान्याची खरेदी करून उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हिंगोली येथे होणार्‍या महोत्सवात नागरिकांनी भेट देवून शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. पवार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक पी.के. उगले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)