शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने वृद्ध महिलेस चिरडले

By admin | Updated: September 13, 2014 00:34 IST

पाचोड : औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवगावजवळ ट्रकने एका सत्तर वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

पाचोड : औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवगावजवळ ट्रकने एका सत्तर वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ट्रकचालक पळून जात असताना पाचोड पोलीस व चिकलठाणा पोलिसांनी त्याला पकडले. देवगाव, ता. पैठण येथील मुक्ताबाई नानासाहेब गिते (७०) या आजारी असल्यामुळे त्या उपचारासाठी रजापूर येथील दवाखान्यात पायी चालल्या होत्या. याचवेळी बीडहून औरंगाबादकडे एक ट्रक सुसाट वेगात चालला होता. या ट्रकचालकाने त्या महिलेला चिरडले. त्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की, त्या महिलेचे शरीर छिन्न-विछिन्न झाले. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने तेथून पळ काढला. तेव्हा आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तात्काळ पाचोड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांना माहिती दिली. कुंभारे यांनी चिकलठाणा पोलिसांना माहिती देऊन सर्वत्र नाकेबंदी केली. पाचोड पोलिसांनी पाठलाग करून हा ट्रक झाल्टा फाट्याजवळ पकडला व पाचोड पोलीस ठाण्यात आणला. त्या महिलेचे शरीर छिन्न-विछिन्न झाल्यामुळे पाचोड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)याच मार्गावर देवगाव फाट्यावर कंटेनर व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कंटेनरमधील चालक माट्टी युसूफ (३३) रा. आंध्र प्रदेश हा गंभीर जखमी झाला. कंटेनर (क्र. एपी ३७ पी.ए. ४७३३) औरंगाबादहून पाचोडकडे येत होता. तर ट्रक (क्र. एम.एच. २५ यू ६५४७) पाचोडहून औरंगाबादकडे जात होता. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.