शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड? छे, फक्त प्रसिद्धीसाठी

By admin | Updated: July 5, 2017 00:19 IST

धर्माबाद : रोपटे लावताना फक्त काढण्यापुरता व तो फोटो व्हॉटस्अप, फेसबुकवर पाठवून सोशल मीडियात चमकोगिरी करण्यापुरतेच हे अभियान दिसत

लक्ष्मण तुरेराव । लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये वृक्ष लागवडीस १ जुलैपासून सुरूवात झाली. वृक्ष लागवड करताना लोकप्रतिनिधी, अधिकारी सहभागी झाले. परंतु रोपटे लावताना फक्त काढण्यापुरता व तो फोटो व्हॉटस्अप, फेसबुकवर पाठवून सोशल मीडियात चमकोगिरी करण्यापुरतेच हे अभियान दिसत असून रोपटे लावल्यानंतर त्याच्या संवर्धनाचे काय? असा सवाल आहे. वृक्ष लागवडीनंतर काही दिवसांतच ही रोपटी नष्ट होतात, असा धर्माबाद तालुक्याचा अनुभव आहे. गेल्यावर्षी लावलेली किती झाडे आजघडीला जगली? याचा जर ताळमेळ काढला तर शासनाच्या आदेशाची औपचारीकता पूर्ण करण्यापुरतेच अभियान निव्वळ कागदावर आहे. गतवर्षीही शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड अभियान राबविले.प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयासाठी उद्दिष्टही देण्यात आले. त्यावर लाखो रूपयांचा खर्चही करण्यात आला. परंतु लागवड केल्यानंतर त्या लावलेल्या रोपट्यांचे काय झाले? हे कुणालाच माहीत नाही. केवळ लागवड करून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी आपले हात झटकले. त्यामुळे संवर्धनाअभावी गतवर्षी लावलेले अनेक रोपटे नष्ट झाल्याचे चित्र तालुक्यात आहे.राज्य सरकारने १ ते ७ जुलैपर्यंत ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुसार वृक्षलागवड करण्यात येत आहे. पण अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी, अधिकारी एखादे झाड लावून फोटो काढण्याचा व त्यानंतर तोच फोटो सोशल मीडियात व वर्तमानपत्रात टाकून "चमकोगिरी" करत आहेत. शासनाच्या उद्दिष्टाला केवळ औपचारिकता पूर्ण करून हरताळ फासण्याचे काम लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून होत आहे, अशा स्थितीत मात्र १ ते ७ जुलैपर्यंत लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडांची पाहणी ही प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती वृक्ष लावण्यात आलेत? वृक्ष योग्यरीत्या लावण्यात आले की नाही? दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता झाली की नाही?, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी व या कामात हलगर्जीपणा व चमकोगिरी करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. तेव्हाच वृक्षलागवड कार्यक्रम हा यशस्वी होईल; अन्यथा योजनेचा बोजवारा होईल हे मात्र निश्चित़