शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पोलेंचा प्रवास काश्मीर टू लातूर

By admin | Updated: August 3, 2014 01:15 IST

लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग पोले शनिवारी रूजू झाले.

 

.लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग पोले शनिवारी रूजू झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सायंकाळी शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारला. अंश सेल्सिअस ऐकूनच थंडी भरणाऱ्या जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातून करिअरची सुरुवात केलेले पोले आता लातूरच्या दुष्काळी मैदानात जिल्हाधिकारी म्हणून उतरले आहेत.पांडुरंग पोले हे २००४ च्या बॅचचे जम्मू काश्मीर केडरचे अधिकारी आहेत. त्यांचा पहिला पदभार पूंछ जिल्ह्यातील मेढा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून होता. त्यानंतर मुंबईच्या अन्न व औषध विभागात उपसचिव म्हणून काम केल्यानंतर ते आता लातूरसारख्या जिल्ह्यात दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी रूजू झाले. पदभार घेतल्यानंतर त्यांनी लातूरबाबत आपल्या गावात आल्याची भावना व्यक्त केली. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील असल्याने पोले यांचा लातूरशी संबंध आलेला. लातूरचा इतिहास चांगला आहे. इथल्या कामाची दखल राज्यभरात घेतली जाते. त्यामुळे कामाचा लातूर पॅटर्न कायम राखण्याचा आपला प्रयत्न राहील, असे पोले म्हणाले. आपण ग्रामीण भागातील असल्याने सर्वसामान्यांच्या समस्यांची आपल्यास जाण आहे. त्यामुळे भेटण्यास येणाऱ्या प्रत्येकाची समस्या ऐकून निवारण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही पोले यांनी सांगितले. दरम्यान, १५ आॅगस्टच्या कालावधीत कधीही निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेचच निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. हे काम समोर असले तरी जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याने पाणीप्रश्न भेडसावणार आहे. त्याअनुषंगाने शक्य तितके अधिक प्रयत्न टंचाई निवारणासाठी आपण करू, अशी ग्वाहीही जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली. (प्रतिनिधी)

लातूरकरांनी प्रेम दिले : विपीन शर्माजिल्हाधिकारी म्हणून माझी पहिलीच पोस्टिंग लातूरला होती. येथील अनुभव अत्यंत चांगला राहिला. लातूरकरांनी भरभरून प्रेम दिले. मी कामास न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाधानी आहे. ई-गव्हर्नन्समध्ये लातूरला राज्यात आघाडीवर नेले आहे. येथील सर्व सहकारी कर्मचारी, नागरिक, लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्यामुळे चांगले काम होऊ शकले, अशी भावना मावळते जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केली.