शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडे हस्तांतरण; नागरिकांना यातना

By admin | Updated: July 4, 2014 01:12 IST

विकास राऊत , औरंगाबाद सिडकोच्या मनपाकडे हस्तांतरणाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मनपाने सिडको- हडकोतील २२ वॉर्डांतील नागरी सुविधांवर अंदाजे ५० कोटी रुपचे खर्च केले आहेत.

विकास राऊत , औरंगाबाद
सिडकोच्या मनपाकडे हस्तांतरणाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मनपाने सिडको- हडकोतील २२ वॉर्डांतील नागरी सुविधांवर अंदाजे ५० कोटी रुपचे खर्च केले आहेत. आठ वर्षांत एवढी रक्कम खर्चूनही सिडकोतील समस्या मात्र ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांना आंदोलने, उपोषणे करावी लागतात.
सिडकोच्या मूळ समस्या तशाच असून, नागरिक पालिकेच्या कारभारालाही वैतागले आहेत. शिवसेना- भाजपा युतीचे १४ नगरसेवक या भागातून पालिकेत निवडून गेले आहेत, असे असतानाही सिडकोवासीयांना वाटाण्याच्या अक्षता मिळत आहेत.
१५ कोटी रुपयांमध्ये सिडको- हडकोतील सेवा- सुविधांचे मनपाकडे हस्तांतरण करून सिडकोने एक प्रकारे माघार घेतली. त्यानंतर आजवर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे सिडको प्रशासनाने ढुंकूनही पाहिलेले नाही. वसाहती निर्माण करायच्या आणि अर्धवट अवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग करून हात वर करायचे. असाच प्रकार सिडकोने केल्यामुळे नागरिकांना अनेक यातनांचा सामना करावा लागत आहे.
ग्रीनबेल्ट वैराण वाळवंटाप्रमाणे वाळून गेले आहेत. जे शिल्लक आहेत, त्यावर म्हशींचे गोठे निर्माण झाले आहेत. उद्याने बकाल झाली आहेत. दोन दिवसांआड अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक वैतागले आहेत. अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे झालेत. त्यांची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. वाहतूक बेट खराब झाले आहेत. ड्रेनेजची जुनाट यंत्रणा वारंवार कोलमडते. अशा समस्यांमध्ये सिडको अडकले असून, मनपा हस्तांतरणामुळे यामध्ये काहीही बदल झाला नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
बॉटनिकल गार्डन आणि काही मर्जीतल्या कामांवर मनपाने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्यामुळे कुठल्याही वॉर्डात पाहिजे त्या प्रमाणात विकासकामे झालीच नाहीत, असे चित्र आहे. सिडको वसाहतीतील नागरी सुविधांसाठी शासनाने मनपाला दिलेले १५ कोटी रुपये एका झटक्यात संपले.
बॉटनिकल गार्डन, कचरा संकलन आणि प्रशासकीय खर्चावर १५ कोटी रुपये खर्च झाले. मनपाने शहरासाठी ५० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. त्यात सिडकोतील एकच रस्ता आहे. रस्ता रुंदीकरण मोहिमेत १०० कोटींची कामे झाली, त्यातसुद्धा सिडकोचा एकही रस्ता नव्हता.
लीजहोल्डचा तंटा मिटेना
1सिडको-हडकोमध्ये सद्य:स्थितीमध्ये ३५ हजार मालमत्ता आहेत. येथील मालमत्ता ९९ वर्षांच्या करारावर असल्यामुळे मालमत्ताधारकांनी मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याची मागणी केली आहे. लीजहोल्ड टू फ्रीहोल्ड करण्याचा मुद्दा सध्या गुलदस्त्यात आहे.
अपुरे मनुष्यबळ
2उपायुक्त, वॉर्ड अधिकारी, कर्मचारी बदल्यांमुळे सिडकोचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. हस्तांतरणानंतर ‘ब’ आणि ‘ई’ ही वॉर्ड कार्यालये सुरू झाली. वॉर्ड अधिकारी, अभियंते आणि तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे ही कार्यालये नेहमीच चर्चेत असतात. २०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असूनही सिडकोवासीयांना सुविधांसाठी मुख्यालयापर्यंत तक्रारी कराव्या लागतात.
सिडकोसाठी मनपाने काय केले
3पालिकेने काल २ जुलै रोजी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सिडको- हडकोत आठ वर्षांमध्ये सुविधा दिल्याचा दावा केला आहे. बॉटनिकल गार्डन, सलीम अली सरोवर सुशोभीकरण, रोझ गार्डन, गरवारे स्टेडियम परिसरात जलतरण तलावाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने म्हटले आहे. आठ वर्षांमध्ये मनपाने कर्तव्य समजून सिडको- हडको परिसरात नियमित रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत देखभाल दुरुस्तीसह वरील कामे करण्याचा प्रयत्न केला आहे.