शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या प्रश्नावर व्यापारी महासंघ आक्रमक

By admin | Updated: May 22, 2014 00:35 IST

हिंगोली : जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दयनिय अवस्था, सातत्याने होणारे विजेचे भारनियमन, ढेपाळलेली आरोग्य सेवा

हिंगोली : जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दयनिय अवस्था, सातत्याने होणारे विजेचे भारनियमन, ढेपाळलेली आरोग्य सेवा या सर्व बाबींमुळे नागरिकांची होणारी हेळसांड पाहून जिल्हा व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली असून, १५ दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने या प्रश्नांमध्ये लक्ष न घातल्यास हिंगोलीची व्यापारपेठ बंद करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, सचिव सुभाषचंद्र लदनिया, नंदकिशोर तोष्णीवाल, शातीलाल जैैन, चंद्रशेखर निलावार, रत्नदीपक सावजी, धरमचंद बडेरा आदी व्यापार्‍यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यामध्ये जिल्ह्यातील ढेपाळलेल्या मुलभूत सुविधांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हिंगोली ते कनेरगावनाका या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून, हिंगोली शहरातील रस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे वाहतुकदारांना, नागरिकांना रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण बनले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुुरूस्तीच्या नावाखाली खोदकाम करून नागरिकांची गैरसोय केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे कसलेही गांभीर्य नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निर्माण होणार्‍या धुळीने नागरिक, व्यापारी यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी तसेच राज्य मार्गावरील व शहरातील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रियागृह महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे रूग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागते. हे शस्त्रक्रियागृह तत्काळ सुरू करावे. हिंगोली शहरात ६ तास भारनियमन केले जाते. वास्तविक पाहता जेथे वीज चोरी आहे, तेथे भारनियमन करावे व तसे फिडर बाजूला काढावे. जे नागरिक व व्यापारी नियमित वीजबील भरतात, त्यांना नाहक त्रास का? असा सवाल करीत येत्या पंधरा दिवसांमध्ये यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा हिंगोलीची व्यापारपेठ बंद ठेवून व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)