शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

...त्या १५ सेकंदांत लागले वैमानिकाचे कौशल्य पणाला

By admin | Updated: May 9, 2014 00:01 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७ मेच्या रात्री मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाच्या हार्ड लँडिंगने प्रवाशांना थरकाप उडविणार्‍या अनुभवाला तोंड द्यावे लागले.

 औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७ मेच्या रात्री मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाच्या हार्ड लँडिंगने प्रवाशांना थरकाप उडविणार्‍या अनुभवाला तोंड द्यावे लागले. या १५ सेकंदांच्या थरारमध्ये वैमानिकाने आपले कौशल्य पणाला लावून प्रसंगावधान आणि अनुभवाच्या जोरावर तात्काळ विमान नियंत्रणात आणले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबईहून रात्री साडेसातच्या सुमारास आलेल्या जेट एअरवेजचे विमान लँड झाल्याबरोबर पुन्हा हवेत उडून नागमोडी होत धावपट्टीवर गेले. त्यानंतर ते पुन्हा सरळ दिशेने धावले. लँड होताच विमान डाव्या बाजूला झुकले आणि पुन्हा सरळ झाले. जेट एअरवेजच्या प्रशासकीय सूत्रांनुसार तांत्रिक कारणांमुळे विमानाने हार्ड लँडिंग केली. त्यामुळे प्रवाशांना जोरदार हिसका बसला. अशातही विमानाने धावपट्टी सोडली नाही. विमान लँड होताच ब्रेक वापरल्यामुळे अथवा विमानतळावरील रनवे वाढविण्यात आल्यामुळे त्याच्या जोडावर विमान उतरल्याने हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. परंतु ठोस कारण मात्र, कोणाकडूनही मिळू शकले नाही. परंतु या घटनेच्या वेळी वैमानिकाचा अनुभव महत्त्वाचा ठरला. अवघ्या १५ सेकंदांच्या घटनेत वेळीच वैमानिकाने विमानावर नियंत्रण मिळविले. विमानाने धावपट्टी सोडली असती तर त्यातून अपघाताची शक्यता अधिक होती. संबंधितांनी वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान नियंत्रणात आणल्यामुळे अनर्थ टाळला गेल्याचा दुजोरा दिला. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल, याबाबत काही सांगता येणार नाही. तसेच घटनेची चौकशी होण्याची शक्यताही नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामागे दडले काय? या घटनेमुळे चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीची स्थिती, तसेच विमानतळाच्या परिसरात वाढलेल्या वसाहतींमधून रात्री येणारा प्रकाश, यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज घेण्यात अडचण येते का ? हा प्रश्न निर्माण होत आहे.