तोरंबा येथे जबरी घरफोडी

By Admin | Updated: August 31, 2015 13:46 IST2015-08-31T13:38:35+5:302015-08-31T13:46:40+5:30

तालुक्यातील तोरंबा येथे चोरट्यांनी जबरी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला

Tomb burglar at Toromba | तोरंबा येथे जबरी घरफोडी

तोरंबा येथे जबरी घरफोडी

 लोहारा : तालुक्यातील तोरंबा येथे चोरट्यांनी जबरी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरात झोपलेल्या नागरिकांच्या अंगावर गुंगीची पावडर टाकून चोरी केली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तोरंबा येथील जाफर अब्बास मुल्ला यांचे कुटुंबिय शनिवारी रात्रीच्या सुमारास घरात झोपले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुल्ला यांच्या घराबाहेर असलेल्या पाणी तापविण्याच्या वतलाच्या विटा काढून आतमध्ये प्रवेश केला. 
घरात झोपलेल्या सर्व नागरिकांच्या अंगावर गुंगीची पावडर टाकली. घरातील कपाटातील सोन्याचे एक नेकलेस, दोन कानातील रिंगा, एक बोरमाळ, मनी-मंगळसूत्र, लेडीज अंगठी, चांदीची चेन व रोख १0 हजार रूपये असा ६८ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना समोर येताच तोरंबासह परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोनि संतोष गायकवाड, सपोनि एस.एन.भिमाळे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या प्रकरणी जाफर मुल्ला यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ए.आर.उंबरे हे करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Tomb burglar at Toromba