सखीमंच सदस्यांसाठी आज रेसिपी शो

By Admin | Updated: June 8, 2014 00:53 IST2014-06-08T00:42:53+5:302014-06-08T00:53:14+5:30

परभणी : लोकमत संखीमंच सदस्यांसाठी ८ जून रोजी फूड फॉर मुड हा रेसीपी शो आयोजित केला आहे़ रविवारी दुपारी २ वाजता डॉ़ हुलसुरे हॉल देशमुख हॉटेल परभणी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे़

Today recipe show for Rakhimanch members | सखीमंच सदस्यांसाठी आज रेसिपी शो

सखीमंच सदस्यांसाठी आज रेसिपी शो

परभणी : लोकमत संखीमंच सदस्यांसाठी ८ जून रोजी फूड फॉर मुड हा रेसीपी शो आयोजित केला आहे़ रविवारी दुपारी २ वाजता डॉ़ हुलसुरे हॉल देशमुख हॉटेल परभणी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे़
लोकमत सखीमंचच्या माध्यमातून लोकमतने जिल्ह्यातील महिलांसाठी यावर्षी विविध उपक्रम राबविले़ महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने हे व्यासपीठ उपक्रम राबविते़ महिलांची खास रुची असते ती पाककलेमध्ये़ त्यामुळे पाककलेतील विविध प्रकार महिला सदस्यांना शिकविण्यासाठी रेसिपी शो आयोजित केला आहे़
या कार्यक्रमात प्रशिक्षक समीर दामले हे ३० पेक्षा जास्त रेसिपी करून दाखविणार आहेत़ त्यात गोड, तिखट, मसालेदार, स्रॅक्स यांचा समावेश आहे़ हा कार्यक्रम पांडुरंग डिस्ट्रीब्युटर्स आणि सोनार महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा अंबिका डहाळे यांनी प्रायोजित केला आहे़ सखीमंच सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखीमंचच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
महिलांनी डायरी आणि पेन सोबत आणावी़ रेसिपी टिपून घेऊन ती शिकावयाची आहे़
सखीमंच सदस्यांना लकी कुपन्स दिलेले होते़ त्याचा पहिला लकी ड्रॉ याच कार्यक्रमात होणार आहे़ तेव्हा सदस्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सखीमंचने केले आहे़

Web Title: Today recipe show for Rakhimanch members