महाविद्यालयांच्या प्रस्ताव दुरुस्तीसाठी आज शेवटचा दिवस

By Admin | Updated: November 30, 2014 01:00 IST2014-11-30T00:22:38+5:302014-11-30T01:00:24+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यानुसार नवीन महाविद्यालयांसाठी सादर केलेल्या प्रस्तावांमधील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

Today is the last day for amendments to the colleges | महाविद्यालयांच्या प्रस्ताव दुरुस्तीसाठी आज शेवटचा दिवस

महाविद्यालयांच्या प्रस्ताव दुरुस्तीसाठी आज शेवटचा दिवस

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यानुसार नवीन महाविद्यालयांसाठी सादर केलेल्या प्रस्तावांमधील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
दुरुस्ती केलेल्या त्रुटींचे प्रस्ताव पुढील आठवड्यात ‘बीसीयूडी’ कार्यालय स्वीकारणार आहे. सन २०१४-१५ च्या बृहत् आराखड्यानुसार नवीन महाविद्यालये सुरू करणे, तुकड्या वाढविणे, वार्षिक तसेच कायम संलग्नीकरण मिळविण्यासाठी ३० आॅक्टोबर ही अखेरची मुदत होती. त्यानंतर ‘बीसीयूडी’ कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छानणी केली असता सर्वच प्रस्तावांमध्ये असंख्य त्रुटी असल्याचे निदर्शनास आले.
यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी सांगितले की, प्राप्त प्रस्तावांमध्ये काही जणांनी प्रमाणपत्रे जोडलेली नाहीत, काहींनी प्रस्तावात अपूर्ण माहिती नमूद केलेली आहे. उद्या रविवारची सुटी असली तरी ‘वेबसाईट’ सुरूच राहील. त्यामध्ये ‘आॅनलाईन’ दुरुस्ती स्वीकारली जाईल. नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी ४० प्रस्ताव, नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी १६, नवीन विषय सुरू करण्यासाठी ३७, वाढीव तुकड्यांसाठी २०, नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांसाठी २९, वार्षिक संलग्नीकरणासाठी ९७, असे एकूण ७४० प्रस्ताव प्राप्त झाले.

Web Title: Today is the last day for amendments to the colleges