लोकमत युवा नेक्स्टतर्फे आज वादविवाद स्पर्धा

By Admin | Updated: December 19, 2014 01:00 IST2014-12-19T00:16:26+5:302014-12-19T01:00:33+5:30

‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे शुक्रवार, दि.१९ डिसेंबर रोजी ‘वॉर आॅफ दी वर्डस्’ ही वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Today debate competition by Lokmat Youth Next | लोकमत युवा नेक्स्टतर्फे आज वादविवाद स्पर्धा

लोकमत युवा नेक्स्टतर्फे आज वादविवाद स्पर्धा

औरंगाबाद : स्वत:चे मत परखडपणे मांडणे हे उत्कृष्ट वक्त्याचे गुण असतात. तरुणांमध्ये असलेला वक्तृत्वाचा गुण वृद्धिंगत करण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे शुक्रवार, दि.१९ डिसेंबर रोजी ‘वॉर आॅफ दी वर्डस्’ ही वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी १ वाजता देवगिरी महाविद्यालयामध्ये ही स्पर्धा होईल. तरुणांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून ‘युवा नेक्स्ट’च्या माध्यमातून अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. वक्तृत्व, नृत्य, संगीत, फॅशन शो या माध्यमातून तरुणांना ‘लोकमत युवा नेक्स्ट’ हे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या वादविवाद स्पर्धेसाठी ‘फ्री मॅसेंजर हा तरुणांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत आहे का?’ हा विषय ठेवण्यात आला
आहे. अधिक माहितीसाठी ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/८४५ंल्ल७३ुं िया पेजला लाईक करा.

Web Title: Today debate competition by Lokmat Youth Next