शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हा बंदची हाक

By admin | Updated: July 18, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : कर्जत तालुक्यातील कोपर्डी (जि़अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिची अमानुष हत्या केल्याच्या निषेधार्थ

उस्मानाबाद : कर्जत तालुक्यातील कोपर्डी (जि़अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिची अमानुष हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे़ याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी दुपारी उस्मानाबादेतील शासकीय विश्रामगृहात आयोजित सर्वपक्षीय, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली़ बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशा कायद्याची तरतूद करावी, असा एकत्रित सूर बैठकीत उमटला़ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे़ माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे़ या घटनेच्या निषेधार्थ आंदोनालची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी दुपारी शहरातील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ बैठकीत प्रारंभी मयत मुलीला श्रध्दांजली वाहण्यात आली़ नगराध्यक्ष संपत डोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थितांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून आरोपींना तात्काळ अटक करून, कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली़ तसेच बलात्काराच्या प्रकरणात आता मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची गरज आहे़ अशी तरतूद झाल्याशिवाय या घटनांना लगाम बसणार नसल्याचा सूर आवळला़ सोमवारी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी ९ वाजता काळ्या फिती लावून मुकमोर्चा काढण्यात येणार आहे़ बैठकीस काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, स्मिता शहापूरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, मराठा महासंघाचे भारत कोकाटे, धर्मवीर कदम, शिवसेनेचे प्रदीप साळुंके, राजाभाऊ घोडके, मसूद शेख, काँग्रेसचे शमीयोद्दीन मशायक, खलील सर, जावेद काझी, मधुकर तावडे, अनिल मंजुळे, डॉ़ चंद्रजित जाधव, विजयकुमार पवार, राजसिंह राजेनिंबाळकर, उमेशराजे निंबाळकर, रोहित निंबाळकर, अग्निवेश शिंदे, विक्रम पाटील, नितीन भोसले, श्रीकृष्ण भन्साळी, बाळासाहेब दंडनाईक, रोहित पडवळ, अभिजित निंबाळकर, ओंकार नायगावकर, जयराज खोचरे, सक्षणा सलगर, शिला उंबरे, नंदा पुनगुडे, मनिषा राखुंडे यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)