शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी तोबा गर्दी

By admin | Updated: August 2, 2014 01:44 IST

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामाची उशिराने पेरणी झाली. जिल्ह्यात अखेर मुदतीला महा ई- सेवा केंद्र बंद पडल्याने सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली

साहेबराव हिवराळे, औरंगाबादपावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामाची उशिराने पेरणी झाली. जिल्ह्यात अखेर मुदतीला महा ई- सेवा केंद्र बंद पडल्याने सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली आणि बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले. कृषी विभागाच्या वतीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांत जनजागृती केल्याने ३१ जुलै मुदतीअखेर ४० ते ५० हजार शेतकऱ्यांना पिकांना संरक्षण देता आले. दरवर्षी अत्यल्प पाऊस अन् कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव यातून शेतकरी सावरलेला नाही. परंतु कृषी विभागाने आता पिकांनाही संरक्षण देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे. खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद, मूग इत्यादी पिकांना संरक्षण शेतकऱ्यांनी दिले आहे. उच्च जोखीम स्तर आणि अतिरिक्त विमा संरक्षण, अल्प, अत्यल्प शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारण विमा असा स्तर ठरविण्यात आला होता. ज्यांच्याकडे जास्तीचे क्षेत्र आहे, त्यांनी जास्त जोखमीचा विमा भरला, तर अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी यंदा बँकांसमोर रांगा लावल्या होत्या. बँकेत बसून शेतकऱ्यांची कागदपत्रे कृषी सहायकांनी तपासून ते बँकेत दाखल केले जात होते. परंतु अनेकांना सातबारा उतारा न मिळाल्याने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू विभाग गाठावा लागला.बाजरीला प्रतिहेक्टरी (संरक्षित रक्कम ६,४०० रुपये) शेतकऱ्यांचा विमा हप्ता २२४ ते २०२ रुपये तर कापूस (संरक्षित रक्कम २१,२०० रुपये), शेतकऱ्यांचा विमा हप्ता २,७५६ रुपये, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी २,४८० रुपये, मका पिकांसासाठी (संरक्षित रक्कम २१,४०० रुपये) शेतकऱ्यांचा विमा हप्ता ५३५ ते ४८२ रुपये, सोयाबीन (संरक्षित रक्कम १७,२००) शेतकऱ्यांचा विमा हप्ता ६०२ ते ५४२ रुपये असा वेगवेळा स्तर ठरलेला आहे. त्यामुळे पीक जोमात आले तर रक्कम बुडाली आणि पिकांनी धोका दिला तर विम्यातून शेतकऱ्यांची ओटी भरून निघेल यासाठी गर्दी वाढली होती. मुदतवाढीची मागणीकागदपत्रांसाठी ग्रामीण व तालुका पातळीवरील महा ई-सेवा केंद्राचे नेटवर्क हँग झाल्याने शेतकऱ्यांना तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खेटे घालावे लागल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले. त्यामुळे मुदत वाढून द्यावी, अशी मागणी शेतकरी सिकंदर जाधव, कारभारी भावले, पूनम बैनाडे, शांतीलाल शेहरे, दादासाहेब सरोदे, कडुबा जाधव, साईनाथ मते, अशोकराव हिवराळे आदींनी केली आहे. दर महिन्याअखेरचा प्रश्न तहसीलदार विजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, महिन्याच्या शेवटच्या दिवशी नेटवर लोड पडल्यामुळे महासेवा केंद्रावरही परिणाम होतो; परंतु तहसील कार्यालयातील सेतूतून सातबारा व अर्ज शेतकऱ्यांना काढता आले.गैरसोयीतून काही शेतकऱ्यांना जावे लागल्याच्या बाबीला त्यांनीही दुजोरा दिला.