शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाचे हप्ते भरण्यासाठी ठगगिरी

By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST

औरंगाबाद : ‘पैशांची गरज आहे, थोड्या वेळाने घरी पैसे परत आणून देतो,’ अशी थाप मारून एका वृद्धाला पाच हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या थापाड्याला अटक केली.

औरंगाबाद : ‘मी तुमच्या शेजारच्याचा भाचा आहे, मला ओळखले नाही का, मला आता तातडीने पैशांची गरज आहे, थोड्या वेळाने घरी पैसे परत आणून देतो,’ अशी थाप मारून एका वृद्धाला पाच हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या थापाड्याला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.रवींद्र प्रभाकर तेली (२६, रा. सध्या टीव्ही सेंटर परिसर, मूळ मालोद, जळगाव), असे त्या थापाड्याचे नाव आहे. गाडीचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसले की, रस्त्याने एखाद्या वृद्ध, भोळ्याभाबड्या नागरिकाला पकडायचे आणि अशी थाप मारून पैसे काढायचे, हा रवींद्रचा उद्योगच असल्याचे तपासात पुढे आले. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवशंकर कॉलनीतील देवीदास शामराव मोहिते (७५) हे ६ मे रोजी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकावर आले. त्यावेळी आरोपी रवींद्र तेली याने त्यांना गाठले. ‘बाबा मला ओळखले का, मी तुमच्या शेजारच्यांचा भाचा आहे,’ असे तो म्हणाला. मोहिते यांनी ‘आमच्या शेजारी राहणाऱ्या दीपक प्रोव्हिजनवाल्यांचा भाचा का तू’ असे विचारताच रवींद्रने हो हो, त्यांचाच भाचा आहे, असे सांगितले आणि मी सतत त्यांच्याकडे येतो, तुम्हाला अनेकदा पाहिले तेथे, असे तो म्हणाला. मग रवींद्रने इकडच्या तिकडच्या गप्पा मारून हळूच ‘मी खूप अडचणीत सापडलो आहे. मला तातडीने पाच हजार रुपये पाहिजेत, तुमच्याकडे असतील तर द्या मी सकाळीच घरी परत आणून देतो,’ असे तो म्हणाला. मोहिते यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यांनी खिशातून पाच हजार रुपये काढले आणि त्याला दिले. घरी गेल्यानंतर मोहिते यांनी शेजारी राहणाऱ्या दीपक प्रोव्हिजनवाल्याला ‘तुमचा भाचा भेटला होता. पैशांची गरज होती, मी त्याला पाच हजार रुपये दिले,’ असे सांगितले. माझा असा कुणी भाचाच नाही, असे शेजाऱ्याने सांगितले. तेव्हा ‘त्या’ भामट्याने थाप मारून आपल्याला गंडविले, असे मोहिते यांच्या लक्षात आले. त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून या फसवणूकप्रकरणी तक्रार दिली होती. जमादार रमाकांत पटारे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. मोहिते यांना गंडविणाऱ्या तरुणाचा वर्णनावरून पोलिसांनी शोध सुरू केला होता.आरोपी रवींद्र बुधवारी पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकावर अशाच एखाद्या वृद्ध- भोळ्याभाबड्याला गंडा घालण्याच्या इराद्याने आला. योगायोगाने तेथे तैनात असलेले पोलीस जमादार रमाकांत पटारे, नरसिंग पवार यांच्या तो नजरेस पडला. वृद्धाला काही दिवसांपूर्वी गंडविणाऱ्या आरोपीचे अन् या तरुणाचे वर्णन सारखेच असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडले.नंतर मोहिते यांना बोलावून घेण्यात आले. पकडलेल्या रवींद्रला पाहताच मोहिते यांनी त्याला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी मोहिते यांची फिर्याद घेऊन रवींद्रला अटक केली.आरोपी रवींद्र एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी दुचाकी खरेदी केली आहे. दुचाकीचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसले की, मी अशा पद्धतीने वृद्ध, भोळ्याभाबड्यांना थाप मारून गंडा घालतो आणि आलेल्या पैशातून हप्ता भरतो, अशी कबुली रवींद्रने दिली.